Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

प्रा. डॉ. महेश मोटे सरांना शैक्षणिक, सामाजिक, पत्रकारितेतील भरीव योगदानाबद्दल विशेष पुरस्काराने सन्मानित;मुरूम व परिसरातील जनतेकडून अभिनंदन व शुभेच्छांचा वर्षाव

मुरुम/प्रतिनिधी
उमरगा तालुक्यातील मुरुम येथील श्री माधवराव पाटील महाविद्यालयात प्राध्यापक या पदावर कार्यरत असलेले प्रा. डॉ. महेश मोटे यांना साप्ताहिक विश्वविनायक न्यूज रिपोर्टरचा शैक्षणिक, सामाजिक व पत्रकारितेमध्ये दिलेल्या भरीव योगदानाबद्दल विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 

विश्वविनायक न्यूज रिपोर्टरच्या दुसऱ्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून मोटे सरांच्या आजपर्यंतच्या शैक्षणिक, सामाजिक, पत्रकारितेमध्ये केलेल्या विविध सामाजिक उपक्रम, विविध कार्यक्रमाद्वारे सामाजिक प्रबोधन, अंधश्रध्दा निर्मूलन, पत्रकारितेमधून वेगवेगळ्या सामाजिक विषयांना वाचा फोडून न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. रविवारी ( ता. २५) रोजी उमरगा येथील श्रीराम मंगल कार्यालयात आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या हस्ते सन्मानचिन्ह, मानपत्र, शाल व वैचारिक ग्रंथ भेट देताना डॉ. मोटे व त्यांच्या सौ. मीरा मोटे यांना सन्मानित करण्यात आले. 

यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष लातूरच्या बसवेश्वर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. श्रीकांत गायकवाड, मराठवाडा निरीक्षक शिवसेना ( शिंदे गट ) किरण गायकवाड, सोलापूर आकाशवाणी निवेदक नितीन बनसोडे, दैनिक पुण्यनगरीचे वृत्त संपादक धनंजय रणदिवे, भाजपचे तालुकाध्यक्ष शहाजीराजे पाटील, महाराष्ट्र लोकविकास मंचचे अध्यक्ष विश्वनाथ तोडकर, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष कैलास शिंदे, श्रीक्षेत्र अचलबेट देवस्थानचे हभप हरी गुरुजी लवटे महाराज, विश्वविनायक न्यूज रिपोर्टरच्या मुख्य संपादिका प्रियंका गायकवाड, कार्यकारी संपादक विकास गायकवाड आदींच्या प्रमुख उपस्थितीत हा सन्मान करण्यात आला.

Post a Comment

0 Comments