Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

आकर्षक फलक, बोलके देखावे, विविध कलाकृतीतून अण्णाभाऊ साठेंची जल्लोषापूर्ण मिरवणूक

 

मुरुम/प्रतिनिधी
अलीकडच्या काळात महापुरुषांच्या जयंतीनिमित्त उत्सव समिती, मंडळे विविध प्रकारच्या कार्यक्रमाचे आयोजन करत असतात. यात सामाजिक, सांस्कृतिक यासह विविध कार्यक्रमांना आवर्जून महत्व दिले जाते. तसेच महापुरुषांच्या मुर्तीची शहरातून मिरवणूक काढून जल्लोष साजरा केला जातो. यंदा मात्र मुरुम शहरात अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या अनुषंगाने शहरातील मुख्य मार्गावरून मिरवणूक रविवारी (ता. २५) रोजी सायंकाळी साठे चौकातून निघाली. 

प्रारंभी उमरगा जनता बँकेचे चेअरमन शरण पाटील, पोलीस उपनिरीक्षक नवनाथ गाडेकर यांच्या हस्ते अण्णाभाऊ साठे यांच्या मूर्तीस पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. यावेळी माजी नगराध्यक्ष बबन बनसोडे, पंकज बनसोडे, लखन देडे, बंडू कांबळे, राजेंद्र देडे, अमित देडे, किरण देडे, तुळशीराम देडे, रघुनाथ बनसोडे, विनायक देडे, सचिन जाधव, शंकर पाटोळे, गुलाब क्षीरसागर, ईश्वर क्षीरसागर आदींनी पुढाकार घेतला. 

हलग्यांच्या कडकडाटात डीजेच्या तालावर तरुणाईने विविध चौकात कलाकारांनी आपली नृत्यकला दाखवली. अण्णाभाऊंच्या जयंतीनिमित्त निघालेल्या मिरवणुकीतील विशेष देखावा शहरवासीयांच्या कौतुकाचा विषय बनला होता. देखाव्यात  अण्णाभाऊ म्हणायचे " पृथ्वी ही शेषनागाच्या मस्तकावर नसून कष्टकरी शेतकऱ्यांच्या श्रमिकांच्या हातावर तरलेली आहे." असे फलक, फिरत्या पृथ्वीचा देखावा, देशभरात होत असलेल्या महिलांवरील अत्याचारांबद्दलचे निषेधाचे फलक तर मागील ट्रॅक्टरमध्ये अण्णाभाऊ साठेंची पूर्णाकृती मुर्ती व त्याच्या बाजूला अण्णाभाऊ साठेंनी आपल्या तेजोमय आयुष्यात लिखाण केलेल्या साहित्यांचे फलक दोन्ही बाजूने लावण्यात आले होते. याशिवाय मूर्तीच्या मागील बाजूस भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर, क्रांतिकारक वीर लहुजी साळवे यांचे फोटो व संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील अनेक महापुरुषांचे फोटो महाराष्ट्राच्या नकाशात देखाव्याच्या रुपाने अण्णाभाऊ साठेंच्या चरित्र व विचारांचा जागर करण्याचे काम जयंती उत्सव मंडळाने केले. यंदा काढण्यात आलेल्या मिरवणुकीतील आकर्षक देखावे हे शहरातील नागरिकांच्या कौतुकाचा विषय बनला होता.                

 मुरूम, ता. उमरगा येथील आकर्षक फलक, बोलके देखावे, विविध कलाकृतीतून अण्णाभाऊ साठेंची जल्लोषापूर्ण शहरातून मिरवणूक काढताना..

Post a Comment

0 Comments