मुरुम/प्रतिनिधी
मुरूम येथील जिल्हा परिषद प्रशालातील विद्यार्थ्यांना सायबर गुन्हेगारीबद्दल सुरक्षा विषयक मार्गदर्शन करण्यात आले लातूर येथील श्री छत्रपती राजर्षी शाहू महाराज महाविद्यालयातील विद्यार्थिनी कु. सहाना दयानंद विभुते हिने सायबर गुन्हे, सोशल मीडिया,मोबाईल ॲप्लिकेशन यातून सायबर क्राईम,होणारी अर्थिक फसवणूक या समस्या कशा निर्माण होतात याचे ज्वलंत उदाहरणावरून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले, त्याचबरोबर यातून आपण,आपले कुटुंब व समाज कसे सुरक्षित राहू शकते याची माहिती उपस्थितांना आपल्या मार्गदर्शनातून दिली.
ही कार्यशाळा प्रशालेत इयत्ता पाचवी ते दहावी विद्यार्थ्यांसाठी आयोजित केली गेली होती,यामुळे विद्यार्थ्यांना मोबाईल फोन, सोशल नेटवर्किंग,वेब साईट वापर यातील समस्या व उपाययोजना याबद्दल यथोचित माहिती मिळाली व त्याबद्दल विद्यार्थ्यांमध्ये उत्साह व समाधान दिसून आले. याप्रसंगी प्रशालेचे मुख्याधापक श्री. विजयकुमार देशमाने , शिक्षक शिवाजी कवाळे , हरिभाऊ माकणे , संतोष कडगंचे , प्रविण ठाकूर , मोहन राठोड , श्रीमती संगिता माने , संगणक शिक्षिका श्रीमती संगिता घुले व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments