Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

राज्यातील आरोग्य खातेतील गटप्रवर्तकांना मिळाला न्याय; चार हजाराची मानधन वाढ ढोकी प्राथामिक आरोग्य केंद्रातील गटप्रवर्तक गुलाल उधळून आनंदोत्सव

       
ढोकी/सुरेश कदम 
महाराष्ट्रातील महायुती सरकारने मंञीमंडळाची  रविवारी साह्यद्री राज्य अतिथीगृह येथे झालेल्या मंञीमंडळ  बैठकीत आरोग्याचा कणा असलेल्या गटप्रवर्तकाच्या मानधनात चार हजार रुपायाची वाढ केल्याने ढोकी ता धाराशिव येथील गटप्रवर्तक व आशास्वंयसेविकाकडुन गुलाल उधळून आनंदोत्सव  साजरा करुन शासनाचे आभार मानले आहे.  


मुख्यमंञी एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली रविवार दि.25 रोजी झालेल्या राज्य मंञीमंडळाच्या बैठकीत महत्वाचे निर्णय घेण्यात आले.      राज्यभरातील ग्रामिण भागातील आरोग्याची सेवा घरोघरी दारी पोहोच करणा-या गटप्रवर्तक व आशास्वंयसेविका यांना राज्य शासनाच्या आरोग्य विभागाडुन तुटपुंजे मानधन देण्यात येते मागील काही महिन्यापुर्वी शासनाने आशाताई यांना पाच हजार रुपयांची तर गटप्रवर्तक यांना केवळ एक हजाराची मानधन वाढ केल्याने राज्यभरातील सर्व गटप्रवर्तक यांच्यात प्रचंड नाराजी पसरली होती. 

संघटनेच्या वतीने मुंबईच्या आझाद मैदानावर वेगवेगळे अंदोलन  मानधन वाढीसाठी करण्यात आले होते  तसेच मुख्यमंञी,एकनाथ शिंदे,आरोग्य मंञी  तानाजीराव सावंत यांना प्रत्यक्ष भेटून गटप्रवर्तक व आशा संघटनेच्या वतीने लेखी  गटप्रवर्तक यांचे मानधनात वाढ करावे असे निवेदन दिले याचीच दखल घेत रविवार दि.25 रोजी झालेल्या बैठकीत राज्य शासनाने गटप्रवर्तक यांच्या मानधनात 4000  हजार रुपायाची  वाढ  अशी घोषणा केल्याने राज्यभरातील गटप्रवर्तक यांना थोडा दिलासा मिळाला गटप्रवर्तक यांची शासन दरबारी दहा हजार रुपयाची मानधन वाढची मागणी होती त्यामुळे थोडी कुशी थोडा गम गटप्रवर्तक मध्ये असुन या मानधनावर राज्यातील गटप्रवर्तक पुर्ण समाधानी नसल्याचे बोलले जाते. ढोकी प्राथामिक आरोग्य केंद्रातील गटप्रवर्तक व आशास्वंयसेविका यांनी गुलाल उधळून गुलाब पुष्पगुच्छ देऊन एकमेकीचे स्वागत करुन सोमवार  दि. 26 रोजी आनंदोत्सव साजरा करण्यात आला 

यानंतर  शासनाचे व आरोग्य मंञी तानाजीराव सावंत,आशा संघटनेचे प्रदेश अध्यक्ष भगवान देशमुख,राज्य संघटक दत्ता देशमुख सुरेखा ठाकुर,नवनाथ धुमाळ यांचे आभार आशा गटप्रवर्तक संघटनेच्या जिल्हाध्यक्षा रेखाताई गुंजकर-कदम यांनी  आभार मानले तर ढोकी प्राथामिक आरोग्य केंद्राचे वैदकीय आधिकारी डाॅ मंगेश क्षीरसागर, यांनी गटप्रवर्तक व आशाताईचे आभिनंदन केले.

यावेळी विजयकुमार अंबुरे,आशाताई वैशाली क्षीरसागर,मनिषा विर,सुरेखा विश्वासे,कल्पना कांबळे,मनिषा ढवारे,कमल कुंभार,सुनिता कांबळे,आशा कदम,शकुतंला निबांळकर ,प्राजक्ता पांचाळ,क्रांती थोडसरे,सुर्वणा पाटील,मोक्षदा रोटे,चांदणी शितोळे,चंद्रकला हाजगुडे,पुष्पा जाधव,आनिता शिंगारे आदी उपस्थित होत्या.

Post a Comment

0 Comments