Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

माणसांने नेहमी चांगल्या गुणांचा स्विकार करत जगावे-- राजयोगिनी शिल्पा क्षीरसागर

       
 मुरूम /प्रतिनिधी
 मी प्रजापिता परिवारात समर्पणाच्या भावनेने आले. तेव्हापासून मी स्वतःच्या अस्तित्वापेक्षा समाजाचे अस्तित्व या पृथ्वीतलावर खूप महत्त्वाचे मानते. ज्यामुळे व्यक्तीचे विचार, वर्तन, आचरण समाजाभिमुख बनुन त्या व्यक्तीला मान मिळतो. हा सन्मान मला प्रजापिता परिवाराकडून मिळाल्याने माझे जीवनच बदलून गेले. माणूसकीशिवाय या जगात दुसरे काही नाही. माणसांने नेहमी चांगल्या गुणांचा स्विकार करत जगावे असे प्रतिपादन उमरगा च्या ब्रह्मकुमारी राजयोगिनी शिल्पा क्षीरसागर बहिणजी यांनी केले.                             

मुरुम येथील प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय सेवा केंद्रात श्रीकृष्ण जन्मोत्सव व शिल्पा दीदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून मार्गदर्शिका म्हणून मंगळवारी (ता. २७) रोजी त्या बोलत होत्या. यावेळी सोलापूरचे ब्रह्मकुमार बसवंत पाटील अध्यक्षस्थानी होते. याप्रसंगी महाराष्ट्र पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष प्रा. डॉ. महेश मोटे, संत निरंकारी मंडळाच्या सौ. मीरा मोटे, रोटरीचे माजी अध्यक्ष डॉ. नितीन डागा, डॉ. शिल्पा डागा, केंद्राचे संचालक राजूभाई भालकाटे आदींची प्रमुख उपस्थिती होती.                       

ब्रह्माकुमारी राजयोगिनी शिल्पा दीदी यावेळी आशीर्वचन देताना म्हणाल्या की, आपण सर्वांनी मिळून माझा जो वाढदिवस संपन्न केलात. अशाच पद्धतीने भविष्यात ही माझा हातून सेवा करण्यासाठी आपण शक्ती दयावी असी भावना त्यांनी व्यक्त केली. यावेळी प्रजापिता विश्वविद्यालयाकडून नुकताच ऑरेंज वर्ल्ड रेकॉर्ड बुकमध्ये नोंद झाल्याबद्दल डॉ. महेश मोटे व मीरा मोटे यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. यावेळी डॉ. महेश मोटे, मीरा मोटे, शिल्पा शेळके, सुजाता तुकशेट्टी, दिपा क्षीरसागर, अनिता पाटील आदींनी आपल्या भावना व्यक्त केल्या. प्रारंभी मुरूमच्या प्रजापिता ब्रह्मकुमारी केंद्राचे संचालक राजूभाई भालकाटे यांनी स्वागतपर मनोगत व्यक्त केले. यावेळी उपस्थिती सर्व मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन केले. कुमारी श्रध्दा शेळके हिने शिवरतन धन पायो या गीतावर नृत्य सादर केले. बबन फडताळे, विठ्ठल कंटेकुरे, मल्लिनाथ कलशेट्टी, वैष्णवी सुर्यवंशी, संजय मिणीयार, श्रीकांत बेंडकाळे, बाळासाहेब भालकाटे, वनिता भोळे, महादेव चनशेट्टी, उषावती चौधरी, लक्ष्मी ढाले, दिलीप हंगरगे आदींनी पुढाकार घेतला. या कार्यक्रमास सोलापूर, धाराशिव, लातूर, उमरगा, लोहारा, दाळींब, कवठा, तावशी, कदेर, केसरजवळगासह शहरातील बहुसंख्येने माता-भगिनी व नागरिक उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक अनिता मिरकले यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजूभाई तुकशेट्टी तर आभार रतन पाटील यांनी मानले.    
               
मुरुम, ता. उमरगा येथील प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयात आयोजित कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी शिल्पा क्षीरसागर, बसवंत पाटील, महेश मोटे, मीरा मोटे, राजूभाई भालकाटे व अन्य.

Post a Comment

0 Comments