मुरुम/प्रतिनिधी
समाजात सर्वत्र वृक्षारोपणाचा झपाटा चालू असतो. फोटो काढून झाला की, वर्षभर त्या झाडाकडे कोणी पाहत नाही. हे बदलायला हवे. सध्या सर्वत्र मोठया प्रमाणात वृक्ष लागवड चालू आहे. लावलेल्या वृक्षाची देखभाल, संवर्धन गरजेचे आहे. अन्यथा हा वृक्षलागवडीचा कोरडा उत्सव वर्षानुवर्ष असाच होत राहील व त्यातून इच्छित उद्दिष्ट आपण साध्य करू शकणार नाही. ११०० वृक्ष लागवडीचे लक्ष्य ठेवताना त्यांच्या शंभर टक्के संवर्धन करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन लातूर येथील वसुंधरा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष प्रा. योगेश शर्मा यांनी केले.
महात्मा बसवेश्वर युवक मंडळाकडून मुरुम पोलीस ठाण्याच्या प्रांगणात आयोजित वृक्षारोपण कार्यक्रमात रविवारी (ता. २५) रोजी प्रमुख पाहूणे म्हणून ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पोउनि ज्ञानेश्वर गव्हाणे होते. यावेळी पोउनि नवनाथ गाडेकर, प्रा. योगेश शर्मा, उपाध्यक्ष रामेश्वर बावळे, राहुल माशाळकर, उमेश बकार्डे, हरिदास निकामे, शिवानंद मुदकन्ना, दत्ता हुळमजगे आदी उपस्थिती होते.
पुढे बोलताना प्रा. शर्मा म्हणाले वृक्ष लागवडीचा उपक्रम करताना त्यांच्या संवर्धनाला महत्त्व द्यायला हवे. वृक्षांच्या स्थानिक प्रजाती, फळझाडे, करंजासारखी दाड सावली देणाऱ्या झाडांना प्राधान्य दिले पाहिजे. या वृक्ष लागवडीच्या चळवळीला प्रत्यक्ष कृतीची जोड देऊन लोक चळवळ बनवली तर त्यांचे सकारात्मक परिणाम दिसतील. सर्व मान्यवरांच्या उपस्थिती पोलीस ठाण्याच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. गव्हाणे यांनी या कार्यक्रमाला शुभेच्छा देऊन मनोगत व्यक्त केले. युवक मंडळाने आनंद नगर जिल्हा परिषद शाळेसह मुरूमच्या विविध जिल्हा परिषद शाळा, नगर परिषद व पोलीस ठाणे यांना विविध जातीचे अकराशे रोपटे सुपूर्द केले. बसवेश्वर युवक मंडळाचे दत्ता हुळमजगे, प्रदीप गव्हाणे, प्रताप गिरीबा, नागेश मुदकन्ना आदींनी पुढाकार घेतला. प्रास्ताविक व सूत्रसंचालन मोहन जाधव तर आभार शरणाप्पा धुम्मा यांनी मानले. यावेळी वसुंधरा प्रतिष्ठान व महात्मा बसवेश्वर युवक मंडळाचे कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.
मुरूम, ता. उमरगा येथील पोलीस ठाण्याच्या परिसरात वृक्षारोपण करताना मान्यवरांसोबत कार्यकर्ते.
0 Comments