Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

धाराशिव येथे सन ग्रुपच्या जागतिक स्तरावरील जॅग्वार बाथरुम मटेरियल दालन शो रूमचे थाटात उद्घघाटन

काटी/धाराशिव,/उमाजी गायकवाड
जिल्ह्यातील नामांकित अशा सन उद्योग समूहाचे सर्वेसर्वा अमरसिंह  देशमुख व संजय देशमुख यांच्या सन उद्योग समूहातील सन सिरॅमिक व अल्युमिनियम हे आपल्या नवीन जागतिक  स्तरावरील ब्रॅण्डेड जॅग्वार बाथरुम मटेरियल शो रूमचे विविध मान्यवरांच्या उपस्थितीत सोमवार  दि. 26 रोजी सकाळी 11:30 वाजता येथील बोंबले हनुमान रोड,गवळीवाडा या ठिकाणी जॅग्वार ग्रुपचे विभागीय प्रमुख उमेश यादव यांच्या हस्ते थाटात उद्घघाटन झाले.

कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आली. त्यानंतर सन उद्योग समूहाचे सर्वेसर्वा अमरसिंह देशमुख यांनी  प्रास्ताविकात सन उद्योग समूहाची माहिती सांगितली. 

दिपप्रज्वलन करताना उमेश यादव, सन ग्रुपचे सर्वेसर्वा अमरसिंह बाजीराव देशमुख, संजय बाजीराव देशमुख आदी...... 

जागतिक पातळीवरील जॅग्वार कंपनी भारतातील टॉप लीडींग इंडियन बाथ ब्रॅण्ड 
       -उमेश यादव
       जॅग्वार ग्रुप विभागीय प्रमुख 

यावेळी बोलताना जॅग्वार ग्रुपचे विभागीय प्रमुख उमेश यादव म्हणाले की, जॅग्वार  कंपनी भारतीय बनावटीची असून 1960 मध्ये स्थापन झालेली ही जॅग्वार ग्रुप ही बाथरूम आणि लाइटिंग कंपनी आहे, जी नळ , शॉवर,शॉवर एन्क्लोजर, सॅनिटरी वेअर, फ्लशिंग सिस्टीम, वेलनेस उत्पादने, वॉटर हीटर्स, कमोड  फ्लॅशिंग, सिस्टीम वॉश बेसिन आणि विविध प्रकारचे दर्जेदार उत्पादने तयार करणारी जॅग्वार ब्रॅण्ड हा भारतातील टॉप लीडींग इंडियन बाथ ब्रॅण्ड आहे व ही कंपनी वर्षभरात 3 कोटी 90 लाख प्रोडक्ट तयार करत असल्याचे सांगून यात 2400 सेवा तंत्रज्ञांसह हजारो लोक या कंपनीत काम करतात आणि 7 उत्पादन युनिट्स असून या जॅग्वार  समुहाचे भारतात 21 ओरिएंटेशन केंद्रे आहेत आणि लंडन, मिलान, सिंगापूर, दुबई, क्वालालंपूर आणि इतर ठिकाणी जागतिक स्तरावर 40 जॅग्वार वर्ल्ड स्टोअर्स असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. तसेच या जॅग्वार समुहाचे जाळे मनसेर, हरियाणासह संबंध भारतभर पसरलेले असून सध्या ते युरोप , मध्य पूर्व , दक्षिण पूर्व आशिया , आफ्रिका आणि सार्क प्रदेशातील 55 पेक्षा जास्त देशांमध्ये कार्यरत असल्याचे सांगितले. सन उद्योग समूहाने सन सिरॅमिक, सनविन  प्लाय, सन इंटिरिओच्या माध्यमातून मागील तीस वर्षापासून केलेल्या गरुड भरारीचे कौतुक करुन जागतिक ब्रॅण्ड असलेल्या जॅग्वार शो रुमसाठी शुभेच्छा दिल्या. 

यावेळी ॲड. अविनाश देशमुख, सरपंच परिषदेचे जिल्हाध्यक्ष सुजित हंगरगेकर, सयाजीराव देशमुख आदी उपस्थित मान्यवरांनी या शो रुमसाठी शुभेच्छा दिल्या.

यावेळी जॅग्वार ग्रुपचे विभागीय प्रमुख उमेश यादव, जॅग्वार ग्रुपचे धाराशिव व सोलापूर जिल्ह्याचे सेल्स एक्झिक्युटिव्ह दयानंद हिबारे, जॅग्वार लाईटचे कृष्णा पवार, सन उद्योग समूहाचे अमरसिंह देशमुख, संजय देशमुख, अरुण  भागवत, माजी नगराध्यक्ष  संपत डोके, धिरज राजेसाहेब लोमटे (नवाब) अंबाजोगाई, भैय्या  देशमुख,विजयसिंह देशमुख, अजयसिंह देशमुख, ॲड. अविनाश देशमुख, प्रा.अभिमान हंगरकर, सरपंच परिषदेचे जिल्हाध्यक्ष सुजित हंगरगेकर, सयाजीराव देशमुख,अशोक  जाधव, प्रदीप साळुंके, प्रकाश गाटे, चंद्रकांत  काटे, सत्यजित  देशमुख, प्रविण  देशमुख,बाबा साळुंके, नवनाथ ढगे,वसंत हेडे, विकास  हंगरकर, प्रदीप देशमुख, अभिजित देशमुख, अमित देशमुख,चेतन भोसले, अमोल देशमुख, गेनदेव कानडे, नितीन चव्हाण, सुनिल गायकवाड, विशाल सुर्यवंशी,आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 दिपप्रज्वलन करताना अमरसिंह देशमुख, संजय देशमुख, प्रदीप देशमुख......

काटी मित्र परिवाराच्या वतीने शुभेच्छा देताना....

Post a Comment

0 Comments