ढोकी/सुरेश कदम
ठाणे जिल्ह्यातील बदलापुर येथील शाळेमध्ये चिमुकुलीवर झालेल्या आत्याचार घटनेच्या निषेधार्थ ढोकी ता धाराशिव येथे निषेध रॅली काढण्यात आली हि निषेध रॅली ढोकी येथील छञपती शिवाजी महाराज चौक येथे आशासुपरवायझर, आशाताई,सर्वे शाळा व ग्रामस्थ एकञ जमुन सकाळी 10 वाजता निषेध रॅली निघाली माणुसकीला काळीमा फासणा-या बदलापुर घटनेचा तिर्व निषेध करत आशासुपरवायजर व आशाताई,शालेय मुली मुले यांनी हातात काळे झेंडे घेऊन महिला संरक्षण कायदा करा,बदलापुर येथील नराधमाला फाशी द्या,आत्याचार करणा-या नराधमाला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे,हम भारत की नारी है,फुल नही चिंगारी है अशा घोषणा देत बदलापूर येथील घटनेचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करुन दोषी आरोपीना कडक शासन करावे अशी मागणी करण्यात आली.
बदलापूर येथील घटनेचा निषेध करण्यासाठी ही निषेध रॅली लातुर -बार्शी राज्यमार्गवरुन छञपती संभाजी महाराज चौक, धनगरगल्ली, वस्तादवाडा, नगरेश्वर नगर,लंगडेगल्ली,काझी गल्ली,गणेश मंदीर, मारवाडगल्ली, हनुमान मंदीर चौकातुन ढोकी सोसायटीसमोर आली. त्या ठिकाणी निषेध रॅलीस धाराशिव जिल्हा आशा व गटप्रवर्तक संघटनेच्या जिल्हाध्यक्षा रेखाताई कदम यांनी फेसबुक वरील अश्लील डीओ पाहून माणसातील हैवान जागा होत आहे तसेच सिनेमातील नटनटीचे अर्धे कपडे, विचित्र पोस्टर्स लावलेली बघून पुरुषामध्ये आत्याचाराचे प्रमाण वाढत असल्याने यावर शासनाने कठोर बंदी घालावी व बदलापुर येथील आरोपीस तात्काळ फास्ट कोर्शिटात फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी आंदोलकांनी केली.
यावेळी उपसरपंच अमोल समुद्रे,पंचायत समितीचे माजी सदस्य संग्राम देशमुख,बहुजन आघाडीचे राहुल पोरे, पहिलवान संघटनेचे तालुकाध्यक्ष सतीश वाकुरे, आरेफ काझी आदींनी बदलापुर येथील घटनेच्या तीव्र निषेधार्थ आपले मनोगत व्यक्त केले.
या निषेध रॅलीत ढोकी प्राथामिक आरोग्य केंद्रातील आशासुपरवायजर, आशाताई, तेरणा साखर कारखाना प्रशाला,सौ स्नेहलता देशमुख विद्यालय,जिल्हा परिषद प्रशाला,जिल्हा परिषद ऊर्दु शाळा,जिल्हा परिषद कन्या शाळेतील मुले, मुली,शिक्षक,शिक्षिका यांच्यासह गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या निषेध रॅलीत फलकांनी वेधले लक्ष
या निषेध रॅलीत संरक्षण कायदा करा; बलात्काऱ्याला फाशी झालीज पाहिजे; महिला सुरक्षित तर देश सुरक्षित; मुलगी वाचवा,मुलगी वाढवा,मुलगी शिकवा;
हमे न्याय चाहिए; सीता बनो तो सिर्फ राम के लिए;
ओरो के लिया दुर्गा, काली चमुंडा बनना तुम्हारा अधिकार है; पविञता सिता जैसी,प्रेम राधा जैसा,पर याद रहे; क्रोध महाकाली जैसा, हर लडकी या औरत मे होना चाहिए आदी फलकांनी सर्वांचे लक्ष वेधले होते.
शेवटी ढोकी पोलिस स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक श्री मोरे यांनी महिलेचे निवेदन स्वीकारले.
0 Comments