Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

तामलवाडी येथील सरस्वती विद्यालयाच्या मुलींचे तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत यश

काटी/उमाजी  गायकवाड
तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी येथील सरस्वती  विद्यालयातील विद्यार्थ्यांनींनी तालुकास्तरीय कुस्ती  स्पर्धेत घवघवीत यश संपादन केले आहे.  

या स्पर्धा शनिवार दि. 24 रोजी तुळजापूर तालुक्यातील सिंदफळ  येथील मुदुगुलेश्वर आखाड्यात भरविण्यात आल्या होत्या.

या स्पर्धेत सरस्वती विद्यालयातील इयत्ता 9.वी मधील 17 वर्ष मुलींच्या वयोगटातून 61 किलो वजन गटातून कु. प्राची चौगुले हिने प्रथम क्रमांक मिळवून घवघवीत यश प्राप्त केले.व कु.पायल घोटकर हिने 17 वर्ष वयोगटातून 69 किलो वजन गटातून प्रथम क्रमांक मिळवला. 

या यशाबद्दल प्रशालेचे मुख्याध्यापक तथा प्राचार्य सुहास वडणे,पर्यवेक्षक माडजे, संस्थेचे अध्यक्ष बसवणप्पा मसुते,सचिव  यशवंत अण्णा लोंढे,व सर्व संचालक मंडळ,आणि सर्व शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी, यांनी  यशस्वी खेळाडूंचे अभिनंदन केले व या यशस्वी खेळाडूंची निवड जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड  झाल्याबद्दल त्यांना शुभेच्छा दिल्या. यशस्वी विद्यार्थ्यांचे पालकांमधून कौतुक होत आहे.

या यशस्वी खेळाडूंना  माळी एम.जी व जाधव पी.पी.यांचे मार्गदर्शन लाभले.

Post a Comment

0 Comments