Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

काटी ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी कॉंग्रेसच्या शुभांगी काटे यांची बिनविरोध निवड; काटी ग्रामपंचायतवर महिलाराज

काटी/उमाजी गायकवाड
तुळजापूर तालुक्यातील प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या काटी ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी कॉंग्रेसच्या सौ.सुभांगी चंद्रकांत काटे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. मावळते उपसरपंच जुबेर शेख यांनी दुसऱ्यांना उपसरपंचपदाची संधी मिळावी हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून राजीनामा दिल्याने त्यांच्या रिक्त जागी उपसरपंच पदाच्या निवडीसाठी बुधवार (दि. 14 ) ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच आशाताई हंगरगेकर यांच्या अध्यक्षतेखाली सदस्यांची बैठक बोलविण्यात आली होती. परंतु ही सभा सरपंच आशाताई हंगरगेकर यांनी कोरम अभावी तहकूब केले होती. गुरुवार दि. 15 ऑगस्ट या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून पुन्हा सरपंच आशाताई हंगरगेकर यांच्या अध्यक्षतेखाली उपसरपंच  पदाच्या निवडीसाठी ग्रामपंचायत सदस्यांची बैठक बोलावण्यात आली. यावेळी बैठकीत उपसरपंच पदासाठी शुभांगी चंद्रकांत काटे यांचा निर्धारित वेळेत एकमेव अर्ज प्राप्त झाल्याने शुभांगी काटे यांची सर्वानुमते बिनविरोध निवड घोषित करण्यात आली. त्यांना सूचक म्हणून  ग्रामपंचायत सदस्य सविता सयाजीराव  देशमुख यांनी स्वाक्षरी केली तर अनुमोदक म्हणून मावळते उपसरपंच जुबेर शेख यांनी  स्वाक्षरी केली. या निवड प्रक्रियेत निवडणूक विभाग निरिक्षक डि.एस नडगिरे, ग्रामविकास अधिकारी लक्ष्मीकांत सुरवसे यांनी महत्त्वाची भूमिका निभावली. गुरुवारी नुतन उपसरपंच शुभांगी काटे यांनी सर्वांच्या उपस्थितीत आपल्या पदाचा पदभार स्वीकारला. 

निवडीनंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते नवनिर्वाचित उपसरपंच सौ. शुभांगी काटे यांचा शाल, श्रीफळ, व पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला.

यावेळी सरपंच आशाताई हंगरगेकर,कॉंग्रेस कमिटीचे जिल्हा उपाध्यक्ष सयाजीराव देशमुख, सरपंच परिषदेतचे जिल्हाध्यक्ष सुजित हंगरगेकर, निवडणूक विभाग निरिक्षक डि.एस नडगिरे, ग्रामविकास अधिकारी लक्ष्मीकांत सुरवसे,चंद्रकांत काटे, प्रदीप साळुंके, प्रकाश गाटे,रामहरी लोंढे,माजी सरपंच शामराव आगलावे, ग्रामपंचायत सदस्य प्रकाश सोनवणे,भैरी काळे आदीजण उपस्थित होते. 

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट कडून सत्कार
राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष अशोक जाधव, प्रदीप साळुंके,वसंत हेडे, धनाजी गायकवाड दुधाजी सोनवणे यांच्या हस्ते सत्कार करुन पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

नवनिर्वाचित उपसरपंच शुभांगी काटे यांच्या निवडीचा महाविकास आघाडीतील कार्यकर्त्यांनी फटाक्यांच्या आतषबाजीत व गुलालाची  मुक्त उधळण करीत जल्लोषात स्वागत करण्यात आले.

     जल्लोष करताना महाविकास आघाडीतील कार्यकर्ते....

ग्रामविकासाचा रथ असाच पुढे चालू ठेवू
या निवडीनंतर सत्काराला उत्तर देताना नुतन उपसरपंच शुभांगी  काटे म्हणाल्या,गावच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही  सर्वजण नेहमीच एकोप्याने काम केले असून भविष्यातही ग्रामविकासाचा रथ पुढे चालूच ठेवू. 
     --नुतन उपसरपंच सौ. शुभांगी चंद्रकांत काटे 
     नवनिर्वाचित उपसरपंच सौ. शुभांगी काटे 

काटी गाव विकासाचे मॉडेल करणार 
 --सरपंच सौ.आशाताई सुजित हंगरगेकर 
यावेळी सरपंच सौ.आशाताई  हंगरगेकर म्हणाल्या, आज दोन्ही महिला सरपंच व उपसरपंच पदांवर असल्याने महिलांच्या अडचणी सोडवण्यास प्रथम प्राधान्य देऊ. सद्या ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावात विविध विकास कामे झाली असून काही ठिकाणी कामे सुरूही आहेत. जेवढी विकास कामे करता येतील ती सर्व कामे ग्रामपंचायतीच्या माध्यमातून नक्कीच आम्ही करणार आहोत.
त्यामुळे भविष्यात काटी हे विकास कामांचे 'मॉडेल' झाल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वासही शेवटी त्यांनी व्यक्त केला.

    --विद्यमान सरपंच सौ.आशाताई सुजित हंगरगेकर.....

यावेळी सरपंच आशाताई सुजित हंगरगेकर, कॉंग्रेस  कमिटीचे जिल्हा उपाध्यक्ष सयाजीराव देशमुख, सरपंच  परिषदेतचे जिल्हाध्यक्ष सुजित हंगरगेकर, चंद्रकांत काटे,अशोक जाधव, रामहरी लोंढे, माजी सरपंच शामराव आगलावे, ग्रामपंचायत  सदस्य प्रकाश सोनवणे,भैरी काळे, अमोल गावडे, सौ.सुनिता सयाजीराव देशमुख,उषा रामहरी लोंढे, अभिमन्यू बामणकर, धनाजी गायकवाड,सुनिल गायकवाड, सुनिल परिट, सचिन साळुंके, सत्यवान बोराडे, संतोष उबाळे, सचिन भोजने, तानाजी हजारे, विकास  साळुंके, बाबाजी शिंदे, बबन शिंदे, दत्ता काटे, शुभम काटे, सचिन  काळे, कालू कुरेशी, कय्युम  कुरेशी,दादा गाढवे आदीसह महाविकास  आघाडीतील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

उपसरपंच निवडीनंतर संबोधित करताना सुजित हंगरगेकर 

Post a Comment

0 Comments