Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

काटी ग्रामपंचायत कार्यालयात भारतीय स्वातंत्र्याचा 78 वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा

काटी/उमाजी गायकवाड
तुळजापूर तालुक्यातील काटी येथील ग्रामपंचायतच्या वतीने गुरुवार दि. 15 ऑगस्ट रोजी ग्रामपंचायत कार्यालयासमोर भारतीय स्वातंत्र्याचा 78 वा स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. 

सरपंच आशाताई सुजित हंगरगेकर यांच्या हस्ते राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करुन ग्रामपंचायत कार्यालयासमोर ध्वजारोहण करण्यात आले. ध्वजारोहण झाल्यानंतर येथील येडेश्वरी कन्या प्रशालेतील विद्यार्थीनींनी समाजप्रबोधनपर घोषणा दिल्या.

यावेळी सरपंच आशाताई हंगरगेकर, उपसरपंच शुभांगी काटे, कॉंग्रेस कमिटीचे जिल्हा उपाध्यक्ष सयाजीराव देशमुख, सरपंच परिषदेचे जिल्हाध्यक्ष सुजित हंगरगेकर, माजी उपसरपंच जुबेर शेख, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष अशोक जाधव, प्रदीप साळुंके, प्रकाश गाटे, वसंत हेडे, अजय देशमुख, ग्रामपंचायत सदस्य प्रकाश सोनवणे, भैरी काळे, अमोल गावडे, सविता देशमुख, सत्यजित  देशमुख, उषा लोंढे, रामहरी लोंढे, माजी सरपंच शामराव आगलावे, अभिमन्यू बामणकर, बाळासाहेब कुलकर्णी, धनाजी गायकवाड, दुधाजी  सोनवणे, सुनिल गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments