काटी:- तुळजापूर तालुक्यातील काटी येथील रहिवासी एक मनमिळाऊ व्यक्तीमत्व असलेले काटीचे सुपुत्र सुनिल पुरुषोत्तम कुलकर्णी वय 55 वर्षे यांचे शुक्रवार दि. 16 ऑगस्ट रोजी दुपारी 3 वाजनेच्या सुमारास मुंबईत सेवा कालावधीत हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने दु:खद निधन झाले.
त्यांच्या अकाली जाण्याने कुलकर्णी परिवारावर दु:खाचा डोंगर कोसळला असून हे दु:ख पेलण्यासाठी त्यांना शक्ती देवो हिच ईश्वरचरणी प्रार्थना!!
त्यांच्या पार्थिवावर उद्या शनिवारी सकाळी 9 वाजता काटी येथील हिंदू स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक विवाहित मुलगी, दोन भाऊ, जावाई असा परिवार आहे.
त्यांच्या आत्म्यास शांती लाभो हिच ईश्वर चरणी प्रार्थना!!
0 Comments