Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

ढोकी येथील फ्रेन्ड्स ग्रुप गणेश मंडळाच्या अध्यक्षपदी अमोल लंगडे तर जिवन थोडसरे उपाध्यक्ष यांची निवड; अर्णवी माजी कन्या योजनादरवर्षी चार मुलींच्या नावे 11 हजार रु डिपाॅझीट गणेश मंडळाच्या बैठकीत निर्णय

ढोकी/सुरेश कदम
धाराशिव तालुक्यातील ढोकी येथील फ्रेन्ड्स ग्रुप गणेश मंडळाची अध्यक्षपदी अमोल लंगडे तर जिवन थोडसरे यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. 

ढोकी येथील विविध समाजिक  धार्मिक,सांस्कृतिक कार्यक्रम गणेश उत्सव साजरा करणारा फ्रेन्ड्स ग्रुप गणेश मंडळ यांची नवीन कार्यकरणी निवडीसह विविध पदाधिका-यांची तसेच  विविध निर्णय घेण्यासाठी सर्व गणेश मंडळाच्या पदाधिकारी यांची नुकतीच बैठक संपन्न झाली या बैठकीत अध्यक्षपदी अमोल लंगडे,उपाध्यक्ष जिवन थोडसरे,सचिव अभिजीत गपाट यांच्या निवडी करण्यात आल्या. 

त्यानंतर मुलींसाठी अर्णवी माजी कन्या योजना राबवुन यामध्ये दरवर्षी  मुलींच्या नावे पोष्ट ऑफीसमध्ये सुकन्या अंतर्गत दर वर्षी तिन ते चार मुलीच्या नावे 11 हजार रुपये फिक्स डिपाॅझीट जमा करण्याचा ठराव सर्वानमते घेण्यात आला. तसेच यावर्षी पासुन गणेश मिरवणुकीवर होणारा सर्व खर्च टाळुन  विविध समाजिक कार्यक्रम घेण्यात येणार आहेत. दरवर्षी 3 ते 4  मुलींच्या नांवे गणेश मंडळाची मिरवणुक खर्च टाळणारा धाराशिव तालुक्यातील पहिला गणेश मंडळ असल्याने या मंडळाचे कौतुक होत आहे. दि.13 रोजी सकाळी 9 वाजता भव्य रक्तदान शिबीर ,दुपारी 1 नंतर दिवसभर महाप्रसाद होईल असे बैठकीत निर्णय घेण्यात आले.

यावेळी मंडळाचे ओम धाकपाडे,गुलचंद लंगडे,आदित्य लंगडे,बालाजी हुनमुने,भैरवनाथ लंगडे,शशीकांत भुतेकर,राजेंद्र लोहार,आबासाहेब लंगडे यांच्यासह गणेश मंडळाचे पदाधिकारी बैठकीस उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments