ढोकी/सुरेश कदम
धाराशिव तालुक्यातील रुई(ढोकी) येथील तेरणा नदीला पुर आल्याने ढोकी ते धाराशिव वाहतुक तब्बल सहा तास बंद होती हा मार्ग बंद असल्याने तेरमार्गे धाराशिवला वहातुक सुरु होती सोमवार दि.2 रोजी पहाटे पाच पासुन वाहतूक बंद होती तसेच रुई लगतच्या अनेक शेतक-याच्या उभ्या पिकात पाणीच पाणी साटल्याने शेतक-याचे पिकाचे प्रचंड नुकसान झाले असल्याचे शेतक-यानी सागितले.
रविवार दि.1 रोजी तेरखेडा ,वाशी व तेरणा धरण परिसरात दिवसभर व राञी जोरदार झालेल्या पावसामुळे रुई(ढोकी) येथील तेरणा नदीच्या पुलावरून प्रचंड पाणी आल्याने पुर आला त्यामुळे या मार्गावरील ढोकी ते धाराशिव वाहातुक तब्बल पाच तास बंद होती. त्यामुळे तेरमार्गे धाराशिवकडे वाहतुक सुरु होती राज्य परिवाहान महामंडळाने पहाटे पासुन या मार्गावरील एसटी बंद ठेवली होती पाण्याचा प्रवाह कमी झाल्याने 11=30 वाजता बस या मार्गावरुन सुरुळीत सुरु झाली तर रुई,तुगांव,थोडसरवाडी येथील अनेक शेतक-याच्या उभ्या पिकात यामध्ये सोयाबीन,तुर यासह ऊसात पाणीच पाणी शिरल्याने काही ठिकाणचे सोयाबीन वाहुन गेले तर अनेक शेतक-याच्या सोयाबीन पिकात पाणी आहे यामुळे शेतक-याचे आर्थिक नुकसान झाले असल्याचे शेतकऱ्याने सागितले आहे.
पुलावरून पाणी प्रचंड वेगाने वाहात असल्याने बघ्याची गर्दी खुपच होती या तेरणा नदीवरील पुलांची उंची वाढवण्यात यावी अशी मागणी प्रवाशी वर्गातुन होत आहे.
पुढील काही तास पावसाचा जोर अशाच प्रकारे कायम राहून नदीने धोकादायक पातळी ओलांडल्यास नदीकाठच्या नागरीकांना धोका निर्माण होऊ शकतो. सर्वांनीच सतर्क व सावध राहिले पाहिजे, तसेच पुलावरून प्रचंड पाणी वाहत असताना कोणत्याही नागरिकांनी सेल्फी फोटो घेण्यासाठी जावु नये तसेच छोटे मोठे दुचाकी वाहाने नेहु नये असे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.
0 Comments