मुरूम/प्रतिनिधी
सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा कार्यक्रमांतर्गत नागरिकांना सायबर गुन्हेगारीबद्दल जागरूकता करून या समस्यातून दक्षता बाळगण्यासाठी मुरूम येथील विठ्ठलसाई साखर कारखाना येथे रविवारी (ता.१) रोजी मार्गदर्शन कार्यक्रम घेण्यात आला. लातूर येथील श्री छत्रपती शाहू महाविद्यालयातील विद्यार्थिनी कु. सहाना विभुते यांनी मार्गदर्शन केले.
क्विक हिल फाउंडेशन व महाराष्ट्र सायबर मार्फत लातूरच्या राजर्षी शाहू महाविद्यालयाच्या वतीने शिक्षा फॉर सायबर सुरक्षा हा उपक्रम विठ्ठलसाई सहकारी साखर कारखान्यात घेण्यात आला.
यावेळी कारखान्यातील कर्मचारी,कामगारांना सायबर क्राईम,मोबाईल फ्रौड,वेबसाईट लिंक आणि फेक स्कीमबद्दल जागरुक होण्याबद्दल सहाना विभूते यांनी सविस्तर माहिती दिली. याप्रसंगी कारखान्यातील सर्व विभाग प्रमुख, अधिकारी, कर्मचारी व कामगार उपस्थित होते. या मार्गदर्शनामुळे उपयुक्त माहिती मिळाल्याने उपस्थितांनी समाधान व्यक्त करून आभार मानले.
मुरूम, ता. उमरगा येथील विठ्ठलसाई सहकारी साखर कारखान्यावर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा हा उपक्रमाची माहितीपत्र सहाना विभुते देताना कारखान्यातील सर्व कर्मचारी वृंद.
0 Comments