मुरुम/प्रतिनीधी
राज्यातील सर्व शाळांमध्ये मुला मुलींच्या सुरक्षिततेसाठी निकोप व समता पूर्वक वातावरण निर्मितीसाठी शाळा स्तरावर सखी सावित्री समिती गठीत करण्यात आली.सखी सावित्री समितीची बैठक जि. प. स्पेशल प्राथमिक शाळा मुरूम येथे संपन्न झाली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापिका तुपेरे प्रमिला प्रमुख मार्गदर्शक अनुसया माने पोलीस उपनिरीक्षक, डॉ. सुवर्णाताई पाटील, प्रमुख अतिथी निर्मलकुमार लिमये अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती, उपाध्यक्ष शिवराज कांबळे, आनंदकुमार कांबळे, पोलीस जमादार विलास राठोड , माता पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रमुख मार्गदर्शिका अनुसया माने यांनी गुड टच बॅड टच, वाईट प्रसंग ओढवल्यास स्वतःचं संरक्षण कसे करावे याचे सखोल मार्गदर्शन केले. डॉ. पाटील यांनी भारतीय संस्कृती, भावनिक, शारीरिक , ताणतणाव, आपला पेहराव व बालमनावर संस्कार करण्यासंबंधी समुपदेशन केले.
प्राथमिक पदवीधर रुपचंद ख्याडे यांनी महिला व बालकल्याण मंत्रालयाच्या चिराग अॅप वरती तक्रार कशी नोंदवावी, शाळेतील तक्रार पेटी संदर्भात माहिती सांगितले. निर्मलकुमार लिमये यांनी सकस आहाराचे सेवन व मानसिक दृष्ट्या सक्षम बनने काळाची गरज आहे असे प्रतिपादन केले.
अध्यक्षीय समारोपप्रसंगी प्रमिला तुपेरे यांनी बालकांचे हक्क व सुरक्षितता संबंधित माहिती सांगितली.
याप्रसंगी परिसरातील महिला धम्ममित्र सुनिता कांबळे, स्नेहल गोडबोले सुकेशनी कांबळे, नगरसेविका विजयश्री गोडबोले,रेश्मा मुरूमकर, महानंदा कांबळे, कल्पना कांबळे मनीषा भालेराव, श्वेता गायकवाड, सविता भालेराव आदि उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुनिता मिरगाळे,मंगल कचले, शिवाजी गायकवाड, अमर कांबळे यांचे सहकार्य लाभले. सुत्रसंचलन रूपचंद ख्याडे व आभार रेणुका कुलकर्णी यांनी मानले.
0 Comments