मुरूम/प्रतिनिधी
उमरगा तालुक्यातील मुरुम येथील ग्रामदैवत श्री कपिलसिद्ध मल्लिकार्जुन यात्रेनिमित्त मंदिर समितीच्या वतीने श्रीशैल, काशी, उज्जैन पिठाचे संचालक तथा जिल्हा बँकेचे अध्यक्ष बापूराव पाटील, मंदिर समितीचे अध्यक्ष प्रशांत पाटील यांच्या संकल्पनेतून श्रावणमासात ता. ९ ऑगस्ट पासून प्रवचनास प्रांरभ झाला.
हुबळी मठाचे मठाधिपती राजशेखर शिवाचार्य महास्वामी यांच्या मधुर वाणीने, पेटीवादक-गायक शिवशरणय्या स्वामी, तबलावादक प्रविण कडंगची यांच्या संगीत सहकार्याने श्रीशैल मल्लिकार्जुन व शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर महात्मे यांच्या जीवनावर पुराण कथा पार पडली. शनिवारी (ता.३१) रोजी रात्री १२ वाजून १० मिनिटाला अग्नी पेठवण्यात आला.
रविवारी (ता.१) रोजी सकाळी भक्तिमय वातावरणात विधिवत पूजन करून पालखीस हनुमान चौकातून सुरवात करुन ग्राम प्रदक्षिणा घालत पारंपारिक खेळ, वाद्याच्या गजरात उत्स्फूर्तपणे भक्तांनी सहभाग घेतला. वरुणराजा बरसत असतानाही श्री मल्लिकार्जुन पालखी सोहळ्याप्रसंगी असंख्य भाविक भक्त तल्लीन झाले होते. बहुसंख्य माता-भगिनी डोक्यावरती कलश घेऊन देवालय समितीने दिलेल्या साड्या परिधान करून ओम नमः शिवाय या जपाचा जयघोष करीत पालखी सोहळ्यात सामील झाल्या होत्या. अष्टगी, लोणी, भोसगे परिवाराच्या घरून वाजत-गाजत कुंभकळस आणण्यात आला.
प्रारंभी अग्नी प्रवेश हुनुमान चौकातून श्री कपिलसिद्ध मल्लिकार्जुन पालखी निघून यादरम्यान बहुसंख्य महिला भगिनीच्या डोक्यावर कुंभकलस घेऊन उत्स्फूर्तपणे सहभागी झाल्या होत्या. शहरातील सोनार गल्ली, अशोक चौक, टिळक चौक, किसान चौक, सुभाष चौक, गांधी चौक या पालखी मार्गावर भाविक भक्तांनी रांगोळी काढून पालखी पूजन व पुष्पवृष्टी करून ठिकठिकाणी स्वागत करण्यात येऊन पालखीचे भक्तांनी दर्शन घेतले. डोंगरे परिवाराकडून भक्तांसाठी दुध तर गांधी चौकातील दुर्गे परिवाराकडून चहापान व्यवस्था करण्यात आली होती. मंदिर समितीच्या वतीने प्रदक्षिणा दरम्यान भक्तांना अल्पउपहार व पाण्याची सोय करण्यात आली होती. सुभाष चौकातून पालखी गांधी चौकाकडे मार्गस्थ झाली त्यावेळी बापुराव पाटील यांनी मल्लिकार्जुन पालखीचे दर्शन घेतले.
यात्रा यशस्वी करण्याकरिता प्रशांत पाटील मित्र मंडळाने पुढाकार घेतला. यावेळी संपूर्ण परिसर भाविक भक्तांच्या सहभागाने गजबजुन गेला होता. ्
मुरुम, ता. उमरगा येथील कपिलसिद्ध मल्लिकार्जुन पालखी मिरवणूक प्रसंगी बहुसंख्य महिला भगिनीच्या डोक्यावर कुंभकलस घेऊन उत्स्फूर्तपणे सहभागी झाल्या होत्या.
0 Comments