मुरुम/प्रतिनिधी
मुरूम येथील नगर शिक्षण विकास मंडळ संचलित प्रतिभा निकेतन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात कार्यरत असलेल्या उपप्राचार्य प्रा. कल्याणी टोपगे यांचा सेवानिवृत्तीबद्दल प्रतिभा निकेतन उच्च माध्यमिक विद्यालयाच्या वतीने सपत्नीक यथोचित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.यांची सेवा 33 वर्ष 2 महीने झाली आहे.
प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते कै. माधवराव (काका) पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी माधवराव पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अशोक सपाटे सर ,उपमुख्याध्याक श्री.घुरघुरे यु. एस. नूतन प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक अष्टगी सर, पर्यवेक्षक विवेकानंद पडसाळगे, ब्याळे के.के.अदी मान्यवर उस्थितीत होते.यावेळी प्रा.ब्याळे के.के.उपमुख्याध्याक श्री.घुरघुरे यु.एस.सत्कार मूर्ती प्रा. कल्याणी टोपगे आदीचे मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमासाठी प्रा.विश्वजित अंभर,प्रा.अण्णाराव कांबळे,ब्याळे के.के.प्रा.संजय गिरी, प्रा.सुधीर नाकाडे, महामुनी उमाकांत, शाळू राजीव,प्रा.अजित सुर्यवंशी सर,नारायण सोलंकर,राघवेंद्र धर्माधिकारी सर, बंडगर बिबिषण, रत्नदीप वाकडे,शोभा पटवारी मॅडम,रेखा उण्णद मॅडम,सतीश रामपूरे,दयानंद राठोड,अजित राठोड,अमोल गायकवाड. आदीसह माजी प्राचार्य, माजी प्राध्यापक, विद्यार्थी व त्याचे हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते.सुत्रसंचालन प्रा.महामुनी उमाकांत.यांनी केले तर आभार प्रा.अजित सुर्यवंशी यांनी मानले.
0 Comments