Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

ढोकी येथे बैलपोळा सण मोठ्या उत्साहात साजरा;सर्जा राजाची सजावट करुन मिरवणुक

ढोकी/प्रतिनिधी
धाराशिव तालुक्यातील ढोकी येथे बैलपोळा सण  सर्जा राजाची आकर्षक  सजावट करुन मिरवणुक काढुन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला
वर्षभर शेतातील नागंरण,मोगडण,पाळी व पेरणी ज्याच्या जिवावर करण्यात येते तो म्हणजे खरा शेतक-याचा मिञ म्हणून सर्जा राजाला बघितले जाते.

त्या सर्जा राजाच्या बैलपोळा सणानिमित्त शेतक-यानी बैल जोडीला कंडे,गोंडे,झुली,लोखंडी शेंब्या,घुंगुरु व रंगीबेरंगी कलरने  आकर्षक सजावट करण्यात आली या सर्जा राजाची गावातील मुख्य वेशीतुन मिरवणूक काढली जाते ढोकी येथील गावाच्या मुख्य वेशीला अंब्याचे तोरंण बाधंतात तोरण तोडण्याचा मान  या वेशीतुन शेतकरी लोंढे यांची बैलजोडी जावुन तोरण तोडल्यानंतर बाकीचे शेतकरी आपली बैलजोडी वेशीतुन नेहतात सर्जा राजाची बेन्जोचा खणखणाट, हलगीचा कडकटाड,पारंपरिक पिपंणी तसेच गुलालाची उधळन व फटाक्याच्या आतिषबाजीत मिरवणूक काढून हनुमान मंदीर प्रदक्षिणा घेऊनच आपल्या घराकडे वाजत गाजत मिरवणूक जाते परत घरी पोहोचल्यावर रांगोळी काढुन घरातील मंडळीनी सर्जा राजाची पुजा अर्चा करुन पुराण पोळीचा नैवेद्य दाखवतात त्यानंतर शेतकरी डोक्यावर चाडे व घोंगड घेऊन पाऊस आला घराला चला अशा घोषणा देऊन सर्जा राजा भोवती प्रदक्षिणा घेतात अशा विविध धार्मिक कार्यक्रमाने ढोकीत सर्जा राजाची भव्य मिरवणूक काढून बैलपोळा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

गावातील वेशीतुन बैलजोडी घेऊन गेल्यावर सर्जा राज्याच्या अंगावर श्रीफळाची  ओवळणी करुन नारळ वेशीवर फेकुन फोडला जातो हा नारळ खाण्यासाठी ग्रामस्थ व युवकांची मोठ्या प्रमाणात झुंबड असते हे विशेष आहे.

Post a Comment

0 Comments