मुरुम/प्रतिनिधी
स्टेट इनोव्हेशन अँड रिसर्च फाउंडेशन, महाराष्ट्र यांच्या मार्फत राष्ट्रीय स्तरावरील शैक्षणिक नवोपक्रम स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत मुरुमच्या जिल्हा परिषद कन्या शाळेतील सहशिक्षिका डॉ. वंदना जाधव यांच्या परिपाठातून तयारी स्पर्धा परीक्षेची या उपक्रमाची राष्ट्रीय स्तरावर नुकतीच निवड झाल्याबद्ल त्यांचा सोलापूर येथे एका विशेष कार्यक्रमात सारथीचे शिष्यवृत्ती प्रमुख अशोक काकडे व ज्येष्ठ साहित्यिक संजय जगताप यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र, सन्मानचिन्ह देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी सोलापूरचे सकाळ आवृत्तीचे संपादक अभय दिवाण, बालभारतीचे सदस्य योगेश सोनवणे, अजयकुमार लोळगे, लातूरच्या जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर, सोलापूरचे शिक्षणाधिकारी कादरी, सर फाउंडेशनचे संयोजक बाळासाहेब वाघ, सिद्धाराम माशाळे, राजकारण चव्हाण आदींची प्रमुख उपस्थिती होती.
राज्यातील उपक्रमशील शिक्षक, अधिकारी विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी सतत प्रयत्नशील असतात. विद्यार्थ्यांच्या शिक्षणात खंड पडू नये, यासाठी नवनवीन उपक्रम, कल्पनांचा वापर करत असतात. प्रत्येक मुलाला सजग करण्याकरिता राबवलेल्या उपक्रमाची माहिती शिक्षण क्षेत्रातील सर्व घटकांना व्हावी. सर्व स्तरातील शिक्षक, अधिकारी यांच्या नवोपक्रशीलता व सृजनशीलतेला प्रोत्साहन देण्यासाठी दरवर्षी राष्ट्रीय नवोपक्रम स्पर्धा स्टेट इनोव्हेशन अँड रिसर्च फाउंडेशन, महाराष्ट्र यांच्या मार्फत आयोजित केली जाते. डॉ. वंदना जाधव यांच्या उपक्रमाला राष्ट्रीय स्तरावर नामांकन मिळाल्याने त्यांच्या या यशाबद्ल सर्वत्र त्यांचे कौतुक करून विशेष अभिनंदन केले जात आहे.
मुरूम, ता. उमरगा येथील वंदना जाधव यांचा अशोक काकडे व संजय जगताप यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र, सन्मानचिन्ह देऊन सत्कार करताना अभय दिवाण, योगेश सोनवणे व अन्य.
0 Comments