Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

येणेगूर बलराम गणेश मंडळ येथे मुरूम पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक गव्हाणे यांच्या हस्ते श्री गणरायाची आरती संपन्न


येणेगुर/प्रतिनिधी
उमरगा तालुक्यातील येणेगुर येथे येणेगूरचे उपसरपंच बाबासाहेब गायकवाड व मुरूम पोलीस स्टेशनचे पोलीस  उपनिरीक्षक गव्हाणे,पो.हे.कॉ.संजीवन शिंदे, येणेगुरचे पोलीस पाटील शिवदर्शन पाटील यांच्या शुभहस्ते पूजा करुन गणरायाची आरती करण्यात आली. आरतीनंतर मंगल मूर्ती मोरया गणपती बाप्पा मोरयाच्या घोषणा देण्यात आल्या.

गणरायाच्या आरतीनंतर बलराम गणेश मंडळाच्या वतीने सर्व मान्यवरांचे सत्कार करण्यात आले. व शुभम बिराजदार यांचा एस.आर.पी.एफ पोलीस दलामध्ये निवड झाल्याबद्दल यांचा शाल हार व टोपी घालून सत्कार करण्यात आला व याच बरोबर गुणवंत विद्यार्थ्याचे दहावीतून प्रथम धनेश्वरी पाटील, गोळा फेक मोठा गट प्रथम क्रमांक मुस्कान तांबोळी व खुशबू तांबोळी यांचाही या गुणवंत विद्यार्थ्यांचे सत्कार करण्यात आले.

यावेळी दयानंद संगशेट्टी,अमोल स्वामी, देवराज बिराजदार,संगप्पा बादुले,महेश मायनाळे,सिद्धेश्वर हलमडगे, मदार भालके, शिराज मुन्शी,मल्लिनाथ थाटे,ओम संगशेट्टी,अनिल मचाले, अलताफ तांबोळी, पप्पू स्वामी,सचिन स्वामी, वैजिनाथ बिराजदार, विठ्ठल पांचाळ,आदम येळीकर,व मोठ्या संख्येने मोठे वडीलधारी माणस व बाळ सदस्य महिला सदस्यांची उपस्थिती होती.

Post a Comment

0 Comments