Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

तामलवाडी पोलीस स्टेशनचे नुतन सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरज देवकर यांचे तामलवाडी ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने स्वागत; कायदा व सुव्यवस्थेला प्रथम प्राधान्य देणार --सपोनि सुरज देवकर

तामलवाडी पोलीस स्टेशनचे नुतन सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरज देवकर यांचा सत्कार करताना उपस्थित पत्रकार बांधव....

काटी/उमाजी  गायकवाड
तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी पोलीस स्टेशनचे नुतन सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून पदभार स्वीकारलेले व यापूर्वी मुंबई,नागपूर नंतर 
नळदुर्ग पोलीस पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले सुरज देवकर यांचा तामलवाडी ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने सोमवार  दि.30 रोजी सकाळी 11 वाजता पुष्पगुच्छ व छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा भेट देऊन सत्काराने स्वागत करण्यात येवून पुढील कार्यकिर्दीसाठी  शुभेच्छा दिल्या. 

तामलवाडी पोलीस स्टेशनचे सपोनि शैलेश पवार यांची बदली मुंबई येथे बदली झाल्याने त्यांचेकडून सपोनि सुरज देवकर यांनी पदभार स्वीकारला.

तामलवाडी पोलीस स्टेशनचे नुतन सपोनि सुरज देवकर यांचा सत्कार करताना उपस्थित पत्रकार बांधव.....

यावेळी सत्काराला उत्तर देताना देवकर म्हणाले की, तामलवाडी पोलीस ठाण्यात काम घेऊन आलेल्या नागरिकांची फरपट होणार याची विशेष दक्षता घेण्यासह कायदा व सुव्यवस्थेला प्रथम प्राधान्य राहणार असल्याची ग्वाही तामलवाडी ग्रामीण पत्रकार संघातील सदस्यांना बोलताना दिली.तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवून आदर्श पोलीस ठाण्यासाठी निश्चित प्रयत्न करणार असून जबाबदारीसह सामाजिक बांधिलकीचे भान ठेवून जातीय सलोखा राखून आपले कर्तव्य पार पाडण्यासाठी व यापुढील काळात तामलवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गुन्ह्याचे प्रमाण करुन गुन्हेगारांचे मत परिवर्तन करुन त्यांना एक चांगला माणूस म्हणून जगता यावे, त्यांची मानसिकता बदलून त्यांना नव्या उमेदीने जगता यावे  तसेच प्रलंबित गुन्ह्यांचा निपटारा करण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी जेष्ठ पत्रकार संतोष मगर,अविनाश गायकवाड, उमाजी गायकवाड,गणेश गायकवाड,यशवंत कुलकर्णी,सचिन शिंदे,बाळु डोलारे, गोपनीय ठाणे अंमलदार आकाश सुरनर,जुबेर काझी यांच्यासह पोलीस कर्मचारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments