Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

पौर्णिमेनिमित्त तुळजाभवानी दर्शनासाठी सोलापूर नळदुर्ग रोडवर भक्तांची पायी वारी; भक्तांच्या गर्दीने भक्तीमार्ग फुलला; पावसामुळे भक्तांची तारांबळ, श्रीनाथ मंगल कार्यालय भक्तांना झोपण्यासाठी खुले

काटी/उमाजी गायकवाड
कोजागीरी पोर्णीमे निमीत तुळजा भवानी मातेच्या दर्शनासाठी सोलापुर तुळजापुर या भक्ती मार्गावर पायी जाणाऱ्या भाविकाची गर्दी 36 तासा पासून कायम आहे पाच ते सहा लाखावर भाविक दर्शना साठी तुळजापुर कडे रवाना झाले आहेत.
मंगळवारी सकाळ पासुन भाविकांच्या रांगा तुळजापुरच्या वाटेने लागल्या होत्या हालगी संभळाच्या तालावर देवीच्या गाण्याचा ठेका धरत भाविक पायी वारी मधे सहभागी झाले होते.

सोलापूर -तुळजापूर रोडवर अहोरात्र अन्नदान वाटप
          बालाजी अमाईन्सच्या वतीने अन्नदान 
रस्त्यावर बालाजी अमाईन्स व तामलवाडी युवा क्लब सोलापुर अन्य लातुर कर्नाटकच्या सेवा भावी संस्था कारखानदार यांचेकडून अहोरात्र अन्नदानाची सेवा चालु होती तर अन्य दानशुर व्यक्ती कडून केळी मसाला दुध गरम पाण्याची सोय करण्यात आली होती. श्रीनाथ मंगल कार्यालयाचे सर्वेसर्वा गणेश पुजारी व महेश पुजारी यांच्या वतीने तब्बल 350 लिटर केशर युक्त दुधाचे वाटप करण्यात आले.
 
श्रीनाथ मंगल कार्यालयाच्या वतीने मसाला दुधाचे वाटप करताना गणेश पुजारी व सहकारी....
गेल्या 36 तासा पासून तुळजापुर सोलापुर भक्ती मार्ग भविकाच्या गर्दीने फुलून गेला तर पाच ते सहा लाखावर भाविक तळजापुर च्या दिशेने रवाना झाले बुधवारी उन्हाचा पारा सहन करीत भाविक पायताना विना पायी वारी करीत आई राजा उदो उदो चा गजर करीत वारी पुर्ण करण्याचा प्रयत्न करीत होते भक्ती महामार्गावर हॉटेल व्यावसायिकानी मोठी गर्दी केली होती.

रस्त्यावरील कचरा संकलन 
बालाजी अमाईन्स लि. यांच्या वतीने व्यवस्थापकीय संचालक एन.राजेश्वर रेड्डी व कार्यकारी संचालक डी.राम रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली तुळजापूरला पायी जाणाऱ्या भाविकांसाठी गेल्या पंचवीस वर्षांपासून मोफत अन्नदान केले जाते, प्रसाद वाटप दरम्यान होणारा कचरा हा रस्त्यावरती जमा होऊन परिसर घाण होऊ नये व घाणीचे साम्राज्य पसरू नये म्हणून बालाजी अमाईन्सच्या संचालक मंडळाच्या सूचनेनुसार जनरल विभागातील सुपरवायजर विठ्ठल गवळी व औदुंबर भरती यांच्या मार्गदर्शनाखाली 3 किलो मिटरची स्वच्छता मोहीम कर्मचाऱ्यानी राबविली.प्रसाद वाटप केंद्राच्या दोन्ही बाजूच्या रोडवरील व परिसरातील पूर्णपणे स्वच्छता केली जात आहे, तसेच गोळा केलेला सर्व कचरा हा डस्टबिन मध्ये साठवून टॅक्टर ट्रॉली मध्ये भरून विल्हेवाट लावली जात  होती.यासाठी बालाजी अमाइन्सचे डेप्युटी जनरल मॅनेजर आर.सुब्बा शास्त्री,असिस्टंट मॅनेजर मारुती सावंत, एच.आर.असिस्टंट ज्ञानेश्वर घोटकर आदीचे  मार्गदर्शन लाभत आहे.

तामलवाडी पोलीस अलर्ट मोडवर 
कोजागिरी पोर्णीमे निमीत्त पायी जाणाऱ्या भाविकाना तलाव विहीरीतील पाण्यापासून धोका होवु नये म्हणुन तामलवाडी पोलीस यंत्रणा अलर्ट झाली आहे रस्त्यावर  सपोनि सुरज देवकर यांच्या मार्गदर्शना खाली चोख पोलीस बंदोबस्त कार्यरत आहे विनाकारण गर्दित घुसणाऱ्या वाहनाची तपासणी करून गर्दित भाविकाना त्रास होणार नाही याची काळजी घेतली जात आहे 

पावसामुळे भक्तांची तारांबळ 
बुधवारी पहाटे दिड वाजता व सायंकाळी तासभर जोरदार पावसाने  सोलापुर तुळजापूर  महामार्गावर  हजेरी लावली पावसाचा मारा सहन करीत भाविक पायी जात होते वृद्ध भाविकांची तारांबळ उडाली होती. त्यामुळे भक्तांनी हॉटेल, ढाबे रस्त्यावरील  शाळा मंदीर घराचा आसरा घ्यावा लागला. 

भक्तांना झोपण्यासाठी तुळजापूर येथील श्रीनाथ मंगल कार्यालय खुले
तुळजापूर येथील श्रीनाथ मंगल कार्यालयाचे मालक गणेश पुजारी यांनी भक्तांना झोपण्यासाठी नळदुर्ग रोडवरील श्रीनाथ मंगल कार्यालय खुले केले होते.

बोबडे परिवाराच्या वतीने अन्नदान 
तुळजापुर तालुक्यातील  सुरतगाव ते वडाळा रस्त्यावर कोजागीरी पोर्णीमे निमीत दर्शनासाठी पायी जाणाऱ्या भाविकांसाठी सावरगाव येथे भाजपा तालुकाध्यक्ष संतोष बोबडे,माजी उपसरपंच आनंद बोबडे, ज्ञानेश्वर बोबडे परिवाराच्या वतीने  बुधवारी अन्नदान करण्यात आले दि.16 व 17 हे दोन दिवस अन्नदान व पिण्याच्या पाण्याची  सेवा पुरविली जाणार आहे यंदा हे त्यांचे 11 वे वर्ष आहे.

Post a Comment

0 Comments