Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

विठोबाच्या माळावर विठ्ठल-रुक्माईच्या भेटीला पंचक्रोशीतील भाविकांची अलोट गर्दी..... यात्रेत नागरिकांनी घेतला मनसोक्त आनंद.....

मुरूम/प्रतिनिधी
उमरगा तालुक्यातील मुरुम येथील माळावरील श्री विठ्ठल-रखुमाई मंदिरात दरवर्षी कार्तिकी अमस्येला या यात्रेची परंपरा व संस्कृती आजही मोठ्या प्रमाणात भक्तांकडून जपली जाते. यंदाही मोठ्या प्रमाणात भाविक पायी चालत यात्रेत उत्स्फूर्त सहभागी झाले होते. यावेळी भक्तिमय वातावरणात भाविकांनी रविवारी (ता. १) रोजी विठ्ठल-रुक्माईचे रांगा लावून दर्शन घेतले. यंदा अधिक पाऊस झाल्याने कडाक्याची थंडी असताना या यात्रेत भाविकांनी मोठी गर्दी केली होती. 

मंदिर परिसरात विविध प्रकारची दुकाने थाटण्यात आली होती. पंचक्रोशीतील अनेक गावातील नागरिक या यात्रेत सहभागी होऊन आनंद लुटताना दिसत होते. गेल्या अनेक वर्षांपासूनची या यात्रेची परंपरा असून  सुंदरवाडी येथून श्री दुधागिरी महाराज, विठ्ठल-रुक्माईची  पालखी व काटी दुपारी टाळ मृदुंगाच्या गजरात, हलगीच्या निनादात वाजत-गाजत आणण्यात आली. मंदिरात प्रस्थान होऊन विधिवत पूजा करण्यात आली. त्यानंतर सायंकाळी काला फोडल्यानंतर यात्रा फुटते. याप्रसंगी या यात्रेत विविध खाद्यपदार्थ, फळ-फळावळे, चिमुकल्यासाठी खेळण्या, कपडे, सौंदर्य प्रसादने, मनोरंजनाची दुकाने थाटलेली होती. या यात्रेमध्ये झोके, झोपाळे व विविध प्रकारची साहित्य लोकांच्या मनोरंजनासाठी लावण्यात आली होती. यातूनही लहान-थोर मंडळींनी या यात्रेचा मनसोक्त आनंद  घेतला. पूर्वी मुरूमच्या पंचक्रोशीतील यात्रेसाठी बैलगाड्या जुंपल्या जायच्या. त्या माध्यमातून शेतकरी, शेतमजूर आपल्या बाळगोपाळांसह या यात्रेत भक्ती भावाने सहभागी व्हायचे. मात्र कालातराने बैलगाड्याची जागा आता मोटार सायकल, चार चाकी वाहने, रिक्षा घेऊन लोक मोठ्या संख्येने सहभागी होताना दिसत होते. मुरूम पोलीस प्रशासनाच्यावतीने यात्रेत अनुचित प्रकार घडू नये. याकरिता पोलीस ठाण्याचे सपोनि डॉ. सदिपान दहीफळेसह पोलीस कर्मचाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. मुरूम नगर परिषदेकडूनही यंत्रणा सज्ज करण्यात आली होती. एकंदरीत या पंचक्रोशीतील वाड्या, तांड्या वस्तीवरील लोक या विठोबा माळावरील श्री विठोबा यात्रा अतिशय भक्तिमय वातावरणात आणि शांततेत पार पडली. दुसऱ्या दिवशी हीच यात्रा मुरूम शहरात भरवली जाते. याला शिळी यात्रा म्हणून अनेक पिढयांपासून संबोधले जाते.   फोटो ओळ : मुरूम, ता. उमरगा येथील माळावरील विठ्ठल-रुक्माईच्या यात्रेत सुंदरवाडी येथून श्री दुधागिरी महाराज, विठ्ठल रुक्माईची  पालखी व काटी दुपारी टाळ मृदुंगाच्या गजरात, हलगीच्या निनादात वाजत-गाजत  मंत्रमुग्ध झालेला भावी भक्त

Post a Comment

0 Comments