Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

प्रजासत्ताक दिनानिमित्त माजी उपसभापती दत्ता शिंदे यांच्या मार्फत जिल्हा परिषद शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना 1000 रायटींग पॅडचे वाटप

काटी/उमाजी  गायकवाड 
प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून पंचायत समितीचे माजी उपसभापती  दत्ता शिंदे यांच्या मार्फत ग्रामीण भागातील तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी  पंचायत समिती गणातील तामलवाडीसह, पिंपळा खुर्द, पिंपळा बुद्रुक, देवकुरुळी, सुरतगाव, सांगवी (काटी) येथील  जिल्हा परिषद शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना विविध  मान्यवरांच्या उपस्थितीत 1000 रायटींग पॅडचे वाटप करण्यात आले.
 
यावेळी उपक्रमाचा शुभारंभ सर्व शाळेतील मुख्याध्यापक, शिक्षक, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य,ग्रामस्थ, नागरिक यांच्या हस्ते वाटप करुन करण्यात आला. 

यावेळी तामलवाडी येथे माजी  उपसभापती दत्ता शिंदे, ग्रामसेवक चैतन्य गोरे, सिकंदर बेगडे,सतीश माळी,प्रशांत राऊत,ज्ञानेश्वर जगताप, सर्जेराव गायकवाड,अमोल घोटकर, कृष्णा घोटकर,जमील शेख, अपसर शेख,अजित अवताडे, विजय कोंडकर,सचिन शिंदे, नागनाथ शिंदे, उपस्थित होते. 

रायटींग पॅडचे वितरण प्रत्येक गावतील सर्व प्रमुख पदाधिकारी, सामजिक कार्यकर्ते,युवक यांच्या हस्ते करण्यात आले.

Post a Comment

0 Comments