Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

'महाराष्ट्र मराठा सोयरीक ' बनलीय देशपातळीवरील लोकं चळवळ! विवाह जुळवणीच्या माध्यमातून समाज प्रबोधनाचाही नवा अध्याय-

तुळजापूर:-लग्न जुळवणे, विवाह घडून आणणे ही सामान्य बाब ....मात्र महाराष्ट्र मराठा वधू वर सोयरिक ने विवाह योग जुळविण्या बरोबर लोक् प्रबोधनाचेही काम गेल्या पाच सात वर्षापासून सुरू केलेले आहे. काळानुरूप बदल, काळाचे पावले ओळखून चालणे हे त्या त्या समाज घटकांचे वैशिष्ट्य ठरते. जे घटक काळानुरूप बदलतात त्याचे चांगले परिणाम दीर्घकाळ टिकतात. काळाची पाऊले ओळखून महाराष्ट्र मराठा सोयरिक ने  सामूहिक विवाहची हाक दिली आहे. ही चळवळ आता लोक चळवळ झाली असून सदर लोक चळवळ ही राज्याबाहेर पोहोचवण्यात श्री सुनील जवंजाळ पाटील यांना यश आलेले आहे. महाराष्ट्र बरोबरच हरियाणा तेलंगणा मध्य प्रदेश येथे सुद्धा वधुवर परिचय मेळाव्याचे यशस्वी आयोजन पार पडलेली आहेत. विदेशात सुद्धा स्थायी झालेल्या समाज बांधवांना संघटित करून तिथेही त्यांनी आपले व्हाट्सअप ग्रुप तयार केलेले आहेत. जिजाऊ, शिवराय ,संभाजी राजे या थोर महापुरुषांच्या जयंतीच्या औचीत्यावर महाराष्ट्र मराठा सोयरिकने आतापर्यंत वधू वर परिचय मेळावे घेऊन एक नवा आदर्श राज्यासमोर ठेवला आहे हे विशेष,! 

महाराष्ट्राच्या मातीत अनेक थोर पुरुष जन्माला आले, ज्यांनी समाजासाठी नवा आदर्श निर्माण केला. त्या परंपरेला पुढे नेत  *"महाराष्ट्र मराठा सोयरीक"* या उपक्रमाने वधू-वर परिचय मेळावे आयोजित केले व करीत आहे .त्या मुळे ही चलवळ एक अभिनव सामाजिक चळवळ ठरलीय.

सुनील जवंजाळ पाटील यांनी घेतले वाहून
चळवळ पुढे नेण्यासाठी समर्पित व झपाटल्यागत वाहून घेणारे हवेत. संस्थापक अध्यक्ष श्री. सुनीलभाऊ जवंजाळ यांचे एकखांबी नेतृत्व लाभल्याने त्यांच्या मार्गदर्शना खाली समाज एकवटत आहे.
या चळवळीचे प्रमुख शिल्पकार आणि "महाराष्ट्र मराठा वधू-वर सोयरीक" चे संस्थापक अध्यक्ष- "श्री. सुनीलभाऊ जवंजाळ." हे समाजहिताच्या भावनेने प्रेरित होऊन कार्यरत आहेत. त्यांनी समाजातील विवाहसंस्थेच्या अडचणी ओळखून, मराठा समाजातील विवाह योग्य युवक-युवतींना एकत्र आणण्यासाठी हा उपक्रम सुरू केला. आज या उपक्रमाने संपूर्ण महाराष्ट्रभर विस्तार केला असून, विवाहसंस्थेच्या पारंपरिक चौकटीत सकारात्मक बदल घडवण्याचा प्रयत्न ते सातत्याने करत आहेत.

सिंदखेड राजा येथील मेळावा ठरला होता ऐतिहासिक!
2018 मध्ये राजमाता जिजाऊ जयंतीच्या निमित्ताने सिंदखेड राजा येथे भव्य वधू-वर परिचय मेळावा आयोजित करण्यात आला. या ऐतिहासिक मेळाव्यास राज्यभरातून हजारो समाज बांधव उपस्थित राहिले. विशेषतः गौरी शिंगणे, सौ. उषाताई खेडेकर, सुरेखा सावळे (जिल्हाध्यक्ष महिला सरिक संघ) सौ. सुनीता रामदास शिंदे, सौ मीनल ताई आंबेकर, नवनीता चव्हाण, डॉ. सौ. शिल्पा दंदाले, डॉक्टर विजया काकडे,सौ. मालिनी सवडतकर, सुरेखा सावळे, सौ सुनीता भास्करराव जाधव, डॉ संजीवनी शेळके, नारायणराव मिसाळ, शेवाळे मामा, माधवराव शेळके, श्री. गणेशराव राजे जाधव, प्रा मधुकरराव देशमुख प्रा नाईकवाडे , डॉ. शिवाजीराव खरात आणि डॉ. बुरुकुल अनिल दंदाले यांनी समर्थपणे त्यांना त्यावेळी साथ दिली व सिंदखेडराजा मेळावा यशस्वी ठरला. 
 नगरपालिकेच्या प्राथमिक शाळेच्या प्रांगणात संपन्न झालेल्या या मेळाव्याने समाजात एक नवा आदर्श निर्माण केला. 

संभाजी महाराज जयंतीनिमित्त मराठा वधूवर परिचय मेळाव्याचे  चिखली येथे आयोजन (2023)
14 मे 2023 रोजी *छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त* शिवाजी हायस्कूल, चिखली येथे वधू-वर परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. श्री. माधवराव जपे, श्री. अशोकराव चौधरी, श्री. नंदूभाऊ सवडतकर, श्री. पंढरी सुसर, श्री. बाळासाहेब ठाकरे, श्री. रमेश बाहेकर, पंडितराव देशमुख, डॉ सत्येंद्र भुसारी, श्री. गावंडे सर यांच्या मोलाच्या सहकार्याने हा मेळावा देखील मोठ्या प्रमाणात यशस्वी झाला.  

आगामी सोहळा: शिवजयंती पर्वावर 19 फेब्रुवारी 2025 ला 
मराठा समाजाच्या एकजुटीचे प्रतीक असलेल्या महाराष्ट्र मराठा सोयरीकतर्फे स्थानिक सर्वपक्षीय समाज बांधवांच्या सहकार्यातून 19 फेब्रुवारी 2025 रोजी मुक्ताई मंगल भवन बोदवड, जि जळगाव येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त वधू-वर परिचय मेळाव्याचे आयोजन* करण्यात आले आहे. या उपक्रमास समाजातील अनेक प्रतिष्ठित व्यक्तींचा पाठिंबा लाभत आहे.  

बोदवड येथील समाजबांधव  मेळाव्यासाठी सरसावले.
बोदवड येथेही वधू-वर परिचय मेळाव्याच्या माध्यमातून समाजात एक सकारात्मक बदल घडवण्याचे कार्य सुरू आहे. आमच्या बोदवडला माझ्या सोबत श्री. रामदासभाऊ पाटील.जलचक्र श्री.किशोर शेळके.सर श्री.सुभाष जगताप सर  श्री.नारायण राऊत.डॉ. सागर महाजन, श्री. राजेंद्र ढोकणे,श्री.संजय पाटील. श्री. अमोल देशमुख डॉ अविनाश घाटे, राकेश बोरसे,श्री.निवृत्ती ढोले. श्री विजय सोनवणे. भागवत जंजाळ,बापुराव देशमुख.नाना पाटील.श्रीराम शेळके.डॉ.बोरसे.बबन शेळके सर.जप्ते सर.अनिल दांदडे सर.शिवाजी साठे सर.विलास सटाले.शैलेश वराडे. तसेच अनेक बोदवडकर व बोदवड तालुक्यातील ज्ञात/अक्षात समाज बांधव.तालुक्यातील  अनेक सरपंच  शिक्षक /शिक्षिका डॉक्टर वकील तसेच सर्व पक्षीय समाजसेवक. धुळे जिल्ह्यातील श्री अविनाश जी भामरे, औरंगाबाद येथील उद्योजक विवेक भोसले, सुप्रसिद्ध विधीतज्ञ नानासाहेब झिगुर्डे, सेवानिवृत्त उपजिल्हाधिकारी श्री सुनील शेळके, अदिती अर्बनचे सर्वेसर्वा श्री सुरेश देवकर, भुसावळ येथील घुले साहेब, जळगाव येथील श्री सुधीर काळवाघे. आदी समाजसेवकांनी तसेच शेजारच्या तालुक्यातील अनेक जेष्ठ / श्रेष्ठ मंडळी* यांनी या कामी विशेषत्वाने पुढाकार घेतला आहे.  

समाजासाठी विधायक दिशा 
मराठा समाजात विवाहसंस्थेच्या अनेक समस्या असून, त्यावर तोडगा काढण्यासाठी अशा वधू-वर मेळाव्यांची नितांत गरज आहे. *महाराष्ट्र मराठा सोयरीकने सुरू केलेली चळवळ ही केवळ विवाह जुळवणीपुरती मर्यादित नसून, समाजातील विवाहसंस्थेला बळकटी देण्याचा आणि समाजातील युवावर्गाला योग्य जीवनसाथी निवडण्याचा सुवर्णसंधी उपलब्ध करून देण्याचा एक व्यापक प्रयत्न आहे.*  

थोर पुरुषांच्या विचारांचा खऱ्या अर्थाने जागर
आज अनेक ठिकाणी थोर पुरुषांच्या जयंत्या केवळ शोभेच्या मिरवणुकांपुरत्या साजऱ्या होतात. मात्र, *महाराष्ट्र मराठा सोयरीकच्या वधू-वर परिचय मेळाव्यांनी जयंत्यांना विधायक रूप दिले आहे.* विवाह संस्था बळकट करण्याच्या या समाजाभिमुख उपक्रमाने मराठा समाजाच्या प्रगतीसाठी एक नवा अध्याय लिहिला आहे.  

"संघटित समाज हाच समर्थ समाज!"
मराठा समाजातील सर्व पोटजातींना सोईर संबंधाच्या माध्यमातून एकत्रित येण्याचे आव्हान मेळाव्याच्या माध्यमातून महाराष्ट्र मराठा सोयरीक गेल्या कित्येक वर्षापासून करीत आहे. तसे असंख्य विवाह सुद्धा घडून आलेले आहेत. पोटजातींनी एकत्र आल्याशिवाय विवाहा चे प्रश्न सुटणार नाहीत हे तितकेच खरे!
जर समाजाने या विधायक उपक्रमांचा स्वीकार केला आणि त्यात सक्रिय सहभाग घेतला, तर समाजातील विवाहसंस्थेतील अडचणी दूर होतील आणि नव्या पिढीला एक सुदृढ आणि सकारात्मक दिशा मिळेल!

शब्दांकन_ श्री उत्तमरावअमृतराव उर्फ नाना, तुळजापूर जि. धाराशिव 

Post a Comment

0 Comments