काटी/उमाजी गायकवाड
तुळजापूर तालुक्यातील कदमवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन शुक्रवार दि.7 रोजी उत्साहात पार पडले. चिमुकल्या मुलांनी सादर केलेल्या शेतकरी गीते, विनोदी गीते, बालगीते, लीलीपूट डान्स, कोळी नृत्य, गोंधळी गीते, धनगर गीते, लावण्या अशा विविध कलाविष्काराने सादर केलेल्या चिमुकल्यांच्या कलागुणांना पालक व प्रेक्षकांनी भरभरून दाद दिली. दरम्यान,चिमुकल्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या विविध कलाविष्काराने उपस्थितांच्या डोळ्याचे पारणे फेडले. मुलांची कला पाहून पालक भारावून गेले. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या एकापेक्षा एक सरस गीते,नृत्य कलाविष्काराला उपस्थित पालकांनी दाद देत त्यांना दिलेल्या प्रोत्साहनपर रक्कमेतून जवळपास 25000 रुपये जमा झाले.
प्रारंभी मंगरूळ बीडचे विस्तार अधिकारी मल्हारी माने यांच्या हस्ते दिपप्रज्वलन व सरस्वती प्रतिमेचे पूजन करुन या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.तर या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विठ्ठल जरासंध मिसाळ होते.
तसेच या कार्यक्रमासाठी नांदुरी केंद्रप्रमुख श्री संजय वाले ग्रामपंचायत सदस्य ज्ञानेश्वर कदम, सुरेश कोकरे, ग्रामसेवक समाधान मार्तंडे,वॉटर सेड सामाजिक संस्थेचे समाज विकास अधिकारी अमर घोरपडे, कुंभारी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक इर्शाद शेख, यमगरवाडी शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर घोडके कोरेवाडी शाळेचे मुख्याध्यापक वडणे ग्रामपंचायत सदस्य साळुंके,ज्येष्ठ नागरिक मच्छिंद्र मोरे,गुलाब वडणे,सूर्यकांत पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक वृंद तसेच शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्षासह शालेय व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य अंगणवाडी सेविका सौ. स्नेहा कदम, ग्रामपंचायत कर्मचारी मारुती (पिंटू)पवार,जय हनुमान गणेश मित्र मंडळातील सदस्य, पालक व गावकऱ्यांनी परिश्रम घेतले.
या कार्यक्रमाचे बहारदार सुत्रसंचलन श्रीमती एस.आर. भुतेकर तर आभार आर के थोडसरे यांनी मानले.
ताज्या बातम्यांसाठी संपर्क करा....
Only न्युज धाराशिव
मुख्य संपादक उमाजी गायकवाड
मो.नं.9923005236
0 Comments