Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

प्रणव सातभाईचा 'इन्फ्ल्युन्सर बुक ऑफ रेकॉर्ड'अवॉर्डने गौरव

नाशिक:- नाशिक शहरातील एक युवा कलाकार, प्रणव सातभाई, त्याच्या अद्वितीय डिजिटल पोर्ट्रेट आर्टसाठी जागतिक स्तरावर ओळखला जात आहे. गेल्या काही वर्षात, प्रणवने १६०० हून अधिक डिजिटल पोर्ट्रेट साकारून एक नवीन विक्रम प्रस्थापित केला आहे, ज्यासाठी त्याला 'इन्फ्ल्युन्सर बुक ऑफ रेकॉर्ड अवॉर्ड'ने गौरविण्यात आले आहे.

या वर्ल्ड रेकॉर्ड किटचे अनबॉक्सिंग पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांच्या कन्या ममता सिंधुताई सपकाळ यांच्या हस्ते माईंच्या 'मांजरी' येथील आश्रमात  करण्यात आले. योगायोग म्हणजे प्रणवच्या वर्ल्ड रेकॉर्डचे 1500 वे पोट्रेट हे सिंधुताई सपकाळ म्हणजेच माईंचे होते.

प्रणव सातभाई हा एक उत्तम फोटोग्राफर आणि डिजिटल पोर्ट्रेट आर्टिस्ट म्हणून ओळखला जातो. लॉकडाऊन दरम्यान, त्याने वेळेचा सदुपयोग करत एडिटिंग कलेच्या आविष्कारातून डिजिटल पोर्ट्रेट साकारले आणि ते सोशल मीडियावरून शेअर केले. हळूहळू, त्याची कला महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशभरातील जनतेपर्यंत पोहोचली. अनेक दिग्गजांनी त्याच्या कलेचे कौतुक केले, ज्यामुळे तो जागतिक स्तरावर नावारूपास आला.

प्रणवने अवघ्या वर्षभरात १००० डिजिटल पोर्ट्रेट साकारत 'वर्ल्ड वाइड बुक रेकॉर्ड'वर आपले नाव कोरले आहे. विविध क्षेत्रातील मान्यवर, कलाकार, तंत्रज्ञ ह्यांच्याशी जोडला गेला आणि त्यांचे डिजिटल पोर्ट्रेट बनवले आहे. ज्येष्ठ समाजसेविका अनाथांची माय सिंधूताई सपकाळ यांच्या आश्रमात त्यांचा जीवनप्रवास उलगडणारी त्यांची डिजिटल पोर्ट्रेट्स प्रणवने साकारली आहेत.
 
प्रणवचा हा विक्रम 'Influencer book of record' मध्ये नोंदवला गेल्याने  त्याच्या यशाची पावती आहे आणि त्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख मिळवून देणारी आहे. १५०० पोर्ट्रेट्स पूर्ण करण्यासाठी त्यांना अनेक महिने लागले, परंतु त्यांच्या कष्ट आणि निष्ठेने हा विक्रम साध्य झाला. प्रणवच्या या विक्रमाबद्दल त्याचे विविध स्तरातून कौतुक होत आहे.

Post a Comment

0 Comments