Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

डिझिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना राज्य कार्यकारणी सदस्यपदी अनिल आगलावे यांची निवड

 
तुळजापूर:-महाराष्ट्र राज्य डिझिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या राज्य कार्यकारणी सदस्यपदी अनिल आगलावे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजा माने यांनी हे नियुक्तीपत्र दिले आहे.

तुळजापूर येथील रेस्टहाऊस येथे दिनांक 19 जानेवारी रोजी धाराशिव जिल्हा कार्यकारणीची निवड आणि नियुक्ती यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी राज्य उपाध्यक्ष सतीश सावंत,सुभाष चिंदे,इकबाल शेखआदींची उपस्थिती होती.

धाराशिव जिल्हा अध्यक्षपदी आयुब शेख,जिल्हा उपाध्यक्षपदी प्रमोद राऊत,दिनेश सलगरे,जिल्हा सचिवपदी सचिन बिंद्री, जिल्हा कार्याध्यक्षपदी ज्ञानेश्वर गवळी,कोषाध्यक्षपदी सूरज बागल,जिल्हा संघटकपदी शिवाजी नाईक, तुळजापूर तालुकाध्यक्षपदी प्रदीप अमृतराव, तालुका उपाध्यक्षपदी राजेंद्र स्वामी,प्रभाकर जाधव, तुळजापूर शहराध्यक्षपदी सचिन ताकमोघे,शहर उपाध्यक्षपदी अमीर शेख यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

Post a Comment

0 Comments