ढोकी/प्रतिनिधी
धाराशिव तालुक्यातील ढोकी येथील भैरवनाथ शुगर संचलीत तेरणा साखर कारखान्याच्या ऊस गटात मकरसंक्रांत व सानिका कदम हिच्या वाढदिवसानिमित्त ऊसतोड महिला मजुरासाठी हळदी-कुंकु कार्यक्रम बुधवार दि .15 रोजी राञी घेण्यात आला या कार्यक्रंमास ऊसतोड मजुर महालांनी मोठा प्रतिसाद दिला नंतर सर्व महिलांना तिळगुळ व थंडीच्या कडक्यापासुन अंग ऊलु नये म्हणून एक बाॅडीलोशन व फळाचे वाटप करण्यात आले.
वर्षातील महिलांचा महत्वाचा सण म्हणून महिला सुवासिनी संक्रातीला एकमेकीच्या घरी ग्रुपने जाऊन हळदी-कुंकु लावुन तिळगुळ देऊन छोट्या मोठ्या वस्तु लुटल्या जातात परंतु प्रत्येक ऊस कारखान्यावरील ऊसतोड महिला मजुर ह्या आपल्या गावापासुन कोसोदुर कारखान्यावर ऊसतोड करुन आपली उपजिविका भागवतात संक्रांत सणाच्या सणापासुन ऊसतोड महिला वंचित राहातात. त्यामुळे आशा व सुपरवायझर संघटनेच्या धाराशिव जिल्हाध्यक्षा रेखाताई गुंजकर-कदम यांच्या संकल्पनेतून त्यांनी तेरणा कारखान्यावर असलेल्या ऊसतोड महिलांसाठी कारखाना ऊस गटात हळदी-कुंकूच्या कार्यक्रम घेऊन व एकमेकिना वाणाची देवाण-घेवान व्हावी म्हणून तसेच दैनिक पुण्यनगरी ढोकी प्रतिनिधी सुरेश कदम यांची कन्या सानिका कदम हिचा वाढदिवस असा सुवर्ण योग आल्याने वाढदिवसाचा इतरञ खर्च वाया न करता ऊसतोड महिलांच्या ऊस गटात जाऊन शेकडो महिलांच्या समावेत साजरा करुन त्यांना हळदी-कुंकु लावून ,तिळगुळ तसेच थंडीपासून अंग ऊलु नये म्हणून प्रत्येक महिलांना बाॅडीलोशन व फळाचे वाटप करुन हळदी कुंकुचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करुन त्यांनी एक स्तुत्य आगळा वेगळा कार्यक्रम घेतल्यामुळे त्यांचे कौतुक होत आहे.
पत्रकार सुरेश कदम यांची कन्या सानिका कदम हिचा वाढदिवस साजरा करताना पत्रकार सुरेश कदम, आई रेखाताई गुंजकर -कदम यांच्यासह उपस्थित मान्यवर..
या कार्यक्रमाला ऊसतोड महिला कामगार यांनी मोठा प्रतिसाद दिला यावेळी आशा व सुपरवायझर संघटनेच्या जिल्हाध्यक्षा रेखाताई गुंजकर-कदम, पञकार सुरेश कदम, सानिका कदम,सार्थक कदम,आशाताई मनिषा ढवारे,आशा कदम,पोलिस पाटील राहुल पाटील,सुरक्षा आधिकारी सुनिल लंगडे,श्री निपाणीकर,हभप शंकर महाराज केंचे,हभप राजेंद्र महाराज काळे,खंडेराया साळुके,संतोष तिवारी,गुलचंद लंगडे यांच्यासह ऊसतोड महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते
भारत हा कृषिप्रधान देश असल्यामुळे व ऊसतोड मजुरांचे कामकाज हे बैलगाडीवर अवलंबून असते त्यामुळे सौ .कदम यांनी गोमाता व ऊसाने भरलेल्या बैलगाडीच्या पूजनांने हळदी-कुंकवास प्रारंभ केला
आम्ही दरवर्षी ऊस कारखान्यावर ऊसतोडीच्या कामासाठी जात असतो परंतु आतापर्यंत कोणीच आमच्या ऊस गटात येऊन हळदी-कुंकु कार्यक्रम घेतला नाही हा कार्यक्रम रेखाताई सुरेश कदम यांनी घेऊन आम्हाला हळदी-कुंकू लावुन तिळगुळ देऊन गोड केले तसेच बाॅडीलोशन व फळाचे वाटप केले त्यामुळे आम्हाला खुप आनंद झाला
सौ.सोनाली लाड,बिड ऊसतोड महिला,तेरणा कारखाना ढोकी
0 Comments