Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

हितगुज करुया मिळून साऱ्याजणी,हळदी कुंकू लावूया अंगणी; ‌ पुजारी परिवारातर्फे हळदी-कुंकू कार्यक्रम उत्साहात संपन्न

तुळजापूर:- तुळजापूर शहरातील पुजारी नगर फाऊंडेशनचे अध्यक्ष गणेश विश्वनाथ पुजारी यांच्या परिवारातर्फे आयोजित मकर संक्रांती निमित्त हळदी-कुंकू कार्यक्रमास शहरातील महिलांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे यशस्वीपणे पार पडला. 

हितगुज करुया मिळून साऱ्याजणी, हळदी कुंकू लेऊया हक्काच्या स्वअंगणी या उक्तीप्रमाणे स्त्रियांनी एकत्र रहावे सुखी संवाद घडावा यासाठी  शुभांगी गणेश पुजारी,सुनंदा विश्वनाथ पुजारी यांनी या उपक्रमाचे आयोजन केले होते.

याप्रसंगी महादेवी लिंबाजी पुजारी,सानिका नागनाथ पुजारी,प्रमिला तानाजी पुजारी,दीपाली सोमनाथ पुजारी,स्नेहा मोरे,नीता पुजारी,संगीता पुजारी,अश्विनी मोटे, डॉ.प्रिया राजेश पाटील,सुमन पुजारी,अनिता अमृतराव,गायत्री अमृतराव,मनीषा छत्रे,जयश्री छत्रे,दीपाली जाधव,अरुणा पुजारी, तुळसा पुजारी,अश्विनी धनके,नंदिनी कोळगे आदी महिलांची मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

या समारंभामध्ये पुजारीनगर सोसायटीतील महिला भगिनी यांना शुभांगी पुजारी व सुनंदा पुजारी यांच्याहस्ते तिळगुळ वाण,पारंपरिक भेटवस्तू वाटप करत हळदी कुंकू कार्यक्रम पारंपरिक पद्धतीने उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी  उपस्थित महिलांसाठी अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली होती.

Post a Comment

0 Comments