Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

शिवश्री तांबे व समृध्दी नन्नवरे यांचे ॲथलेटिक्स स्पर्धेत घवघवीत यराज्यस्तरीय ॲथलेटिक्स स्पर्धेसाठी निवड

धाराशिव/प्रतिनिधी 
धाराशिव येथे पार पडलेल्या ॲथलेटिक्स स्पर्धेत तुळजापूर  तालुक्यातील कुंभारी येथील शिवश्री जगजीवन तांबे व समृध्दी अमर नन्नवरे यांंनी उत्तम कामगिरी करत प्रथम क्रमांक पटावित सुवर्णपदकांची कमाई केली. त्याबद्दल  त्यांचे सर्व स्तरातून  कौतुक होत आहे.

धाराशिव येथील तुळजाभवानी स्टेडियमवर दि.10 जानेवारी रोजी धाराशिव जिल्हा अमॅच्युअर ॲथलेटिक्स असोसिएशन यांच्या वतीने सबज्युनिअर ॲथलेटिक्स अजिंक्य स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. या स्पर्धेत लोटस पब्लिक स्कूल तुळजापूर येथे शिक्षण घेत असलेल्या शिवश्री जगजीवन तांबे व समृध्दी अमर नन्नवरे यांंनी सहभाग घेतला होता.या स्पर्धेत मुलांच्या दहा वर्षे वयोगटात 100 मीटर धावणे या क्रिडा प्रकारामध्ये शिवश्री तांबे या मुलाने प्रथम क्रमांक पटकवित सुवर्ण पदक मिळवले तर 50 मीटर धावणे या क्रिडा प्रकारामध्ये द्वितीय क्रमांक पटकाविला तसेच मुलींच्या 80 मीटर धावणे या क्रिडा प्रकारामध्ये समृध्दी नन्नवरे या मुलीने प्रथम क्रमांक पटावित सुवर्णपदकाची कमाई केली. मुला मुलींच्या या ॲथलेटिक्स स्पर्धेत दोघांनीही उत्तम कामगिरी करत सुवर्ण पदक पटकावल्याने महाराष्ट्र ॲथलेटिक्स स्पर्धेचे सचिव योगेश थोरबोले व क्रिडा प्रशिक्षक राहुल जाधव यांच्या हस्ते शिवश्री तांबे व समृध्दी नन्नवरे यांना सुवर्णपदक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले व पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

शिवश्री जगजीवन तांबे व समृध्दी अमर नन्नवरे या दोघांनीही ॲथलेटिक्स स्पर्धेत जिल्ह्यास्तरावर उत्तम कामगिरी करुन घवघवीत यश संपादन केल्याने त्यांची राज्यस्तरीय ॲथलेटिक्स स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे. त्यांच्या या यशाबद्दल सर्व स्तरातुन त्यांचे अभिनंदन केले जात असुन त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

क्रिडा प्रशिक्षकांचे मोलाचे सहकार्य लाभले 
जिल्हास्तरीय ॲथलेटिक्स स्पर्धेत सुवर्णपदक मिळवून आम्ही जी कामगिरी केली व आमची राज्यस्तरीय ॲथलेटिक्स स्पर्धेसाठी निवड झाली आहे यासाठी आम्हाला क्रिडा प्रशिक्षक राहुल जाधव व ॲड. जगजीवन तांबे यांचे मोलाचे सहकार्य लाभले असल्याचे सुवर्णपद विजेते शिवश्री तांबे व समृध्दी नन्नवरे यांनी बोलताना सांगितले.
                          समृध्दी नन्नवरे 

Post a Comment

0 Comments