Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

दहावीच्या 1975 च्या वर्गातील विद्यार्थांचे तुळजापूरात 50 वर्षानंतर अनोखे स्नेहसंमेलन! अर्धशतकानंतर आजोबा झालेल्या सवंगड्यांनी दिल्या जुन्या आठवणींना उजाळा

तुळजापूर/उमाजी गायकवाड 
तुळजापूर शहरातील ज्ञान मंदिर समजल्या जाणाऱ्या पहिल्या जिल्हा परिषद प्रशालेच्या 1975 च्या  बॅचमधील आजोबा झालेल्या वयोवृद्ध वर्गमित्रांचे अनोखे स्नेहसंमेलन मंगळवार दि. 21 रोजी सकाळी 10 ते 3:30 या कालावधीत येथील नळदुर्ग रोडवरील श्रीनाथ लॉंन्स मध्ये मोठ्या उत्साहात व आनंदी वातावरणात  पार पडले.

इयत्ता दहावी म्हणजे प्रत्येकाच्या शैक्षणिक मार्गातील महत्वाचा टप्पा. या टप्प्यानंतर प्रत्येकजण आपापल्या योग्यतेनुसार, आवडीनुसार पुढच्या मार्गाची निवड करत असतो. असा हा टप्पा ओलांडून आज या बॅचला 50 वर्षे झाली, अर्थातच ते साल होते 1975.  तुळजापूर येथील जिल्हा परिषद प्रशालेतून दहावीची परीक्षा दिल्यानंतर या  बॅचमधील  बहुतांशी मित्र, मैत्रिणी वेगवेगळ्या मार्गांनी गेले. करिअरच्या मागे धावत असताना दोस्तांना भेटणं तर दूरच पण बोलणंही नव्हतं. परंतु व्हॉट्सअँप, फोन आणि फेसबुकने या बॅचमधील मैत्रीचा पुर्नजन्म घडवला. 

या सर्व विद्यार्थ्यांना शाळा सोडून पन्नास वर्षे पूर्ण झाली असतानाही या प्रदीर्घ कालावधीनंतर त्यांच्या  बॅचमधील विश्वनाथ पुजारी व अन्य  मित्रांच्या पुढाकाराने आपल्या बॅचमधील एकमेकांचा कसून शोध घेऊन या बॅचमधील 50 विद्यार्थ्यांनी तब्बल 50 वर्षानंतर स्नेहसंमेलनाचा मनमुराध आनंद घेतला. खरे म्हणजे अतिशय खेळीमेळीच्या व आनंदाच्या वातावरणात संपन्न झालेले 50 वर्षानंतरचे हे स्नेह संमेलन एक प्रकारे हा सुवर्ण महोत्सवच होता. या स्नेह मेळाव्यासाठी प्रामुख्याने विश्वनाथ पुजारी यांनी पुढाकार घेतला होता.यापैकी काही वर्गमित्रांकडे फोन,मोबाईल ईमेल फेसबुक अशी कम्युनिकेशनची साधने उपलब्ध नसल्याने मित्रांना शोधायला खूपच वेळ लागला. शोधाशोध हे कठीण काम असतानाही आम्ही एकमेकांच्या सहाय्याने सर्वांचा शोध घेतल्याचे विश्वनाथ पुजारी यांनी सांगितले. या अनोख्या पार पडलेल्या स्नेह संमेलनात सर्व मित्रांनी वर्गातील एकमेकांच्या माहितींची देवाणघेवाण झाली. गप्पा सुरु झाल्या.आपलं लग्न, जोडीदार, मुलं,नातवंडे याबद्दल सगळ्यांनी आपापले विचार शेअर केले. प्रत्येकजण आपापल्या कहाण्या सांगण्यास उतावीळ झाले होते. बोलता बोलता थट्टा मस्करीही होत होती. सर्वानीच शालेय जीवनातील गमतीजमती सांगितल्या.यातील  अनेकांनी शालेय जीवनातील किस्से सांगून सर्वांना दिलखुलास हसवलं. अनेक मित्रांनी जुन्या आठवणी जागवल्या. आपल्या आयुष्यातील सुख दुःखाचे क्षण एकमेकांशी शेअर करत उर्वरित आयुष्यात एकमेकांना मानसिक आधार देण्याची शपथ घेतली.तब्बल पन्नास वर्षांनी जेष्ठ वर्गमित्र एकत्रितपणे एका ठिकाणी येत सामूहिक संवादासह शालेय गप्पांची मैफिल रंगतदार झाली होती.

याप्रसंगी प्रत्येक वर्गमित्रांनी आपला परिचय देत आजची वैयक्तिक व्यवसायिक स्थिती व कौटुंबिक स्थितीबद्दल माहिती सांगितली.शालेय जीवनातील जुन्या आठवणी व गमतीजमती मधून व आपल्या संवादातुन जुन्या  आठवणींना उजाळा दिला. 

उत्कृष्ट नियोजन.....
या कार्यक्रमाचं नियोजन विश्वनाथ पुजारी यांनी  उत्तमरीत्या केलं होतं. येणाऱ्यांशी संपर्क साधण्यापासून ते जेवण व्यवस्थेपर्यंत  झकास व्यवस्था त्यांनी केली होती. जेवणात चपाती, तुळजापूरातील झणझणीत मटण, कोशिंबीर, चिकन बिर्याणी असा उत्तम बेत झाला होता.

कार्यक्रम यशस्वीतेसाठी यांनी घेतला पुढाकार 
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विश्वनाथ पुजारी,  सुदर्शन पांढरे,शहाजी रोचकरी,आनंत कोंडो,विनोद खपले,गोपाळ कावरे,नवनाथ पुजारी,नरेश पेंदे, संपत जळके,आयुब शेख,दत्ता शित्रे,आंबादास औटी,प्रदीप पाटील,राजाभाऊ साळुंखे, नागनाथ वाघ, लाईक सिद्धिगी,अरविंद नडमने, शिवाजी कापसे,अनिल भांजी, प्रमोद देशमुख,डॉ.महादेव पाटील,दिलीप कदम,धनंजय हुंडेकरी आदींनी परिश्रम घेतले.

या स्नेहमेळाव्यात स्नेहभोजनानंतर एकमेकांना तिळगुळ वाटप करून कार्यक्रमाची गोड सांगता झाली.

गेट टूगेदरमुळे एकमेकांचे सुख दुःख शेअर करता आली
आमची 1975 ची दहावीची बॅच. 50 वर्षांनंतर गेट-टुगेदर निमित्ताने एकत्र आणली. दहावीनंतर अनेकांचा संपर्क नव्हता. यानिमित्त एकमेकांच्या सुख-दुःखाच्या गोष्टी शेअर करता आल्या.
संयोजक विश्वनाथ पुजारी,
पुजारी नगर, तुळजापूर

Post a Comment

0 Comments