काटी/उमाजी गायकवाड
तुळजापूर तालुक्यातील सावरगाव येथील विद्युत उपकेंद्रातून सावरगाव, जळकोटवाडी, वडगाव (काटी) या गावांना शेती पंपासाठी वीज पुरवठा केला जातो. सावरगाव येथील विद्युत पुरवठा केला जाणारा 5 एच.पी.क्षमतेचा ट्रान्स्फॉर्मर बदलून 10 एच.पी.क्षमतेचा ट्रान्सफॉर्मर बसवला परंतु नवीन ट्रान्सफॉर्मर चार्जिंग नसल्यामुळे विद्युत पुरवठा सलग तीन दिवस बंद होता. तीन दिवसांनंतर विद्युत पुरवठा सुरू झाला परंतु सतत वीज पुरवठा खंडित होत असल्याने रब्बी पिके धोक्यात आली असून द्राक्ष काढणीस आल्याने द्राक्ष बागायतदारांची चिंता वाढली आहे. शुक्रवारी पाचव्या दिवशीही वीज पुरवठा खंडित होता
सुरुवातीपासून भारनियमन, तर अनेक भागांत कमी दाबाने व मधूनच खंडित होणारा वीजपुरवठ्यामुळे पिकांना सिंचन करताना अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे ‘सांगा आम्ही शेती करू कशी?’ असा संतप्त सवाल द्राक्ष बागायतदारासह शेतकऱ्यांमधून विचारला जात आहे.वरिष्ठ अधिकाऱ्यांनी यामध्ये लक्ष घालून सावरगाव विद्युत उपकेंद्रातून होणारा विद्युत पुरवठा सुरळीत करावा अशी मागणी शेतकरी वर्गातून केली जात आहे.
सुरुवातीपासून भारनियमन, तर अनेक भागांत कमी दाबाने व मधूनच खंडित होणारा वीजपुरवठ्यामुळे पिकांना सिंचन करताना अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे ‘सांगा आम्ही शेती करू कशी?’ असा संतप्त सवाल द्राक्ष बागायतदारासह शेतकऱ्यांमधून विचारला जात आहे.
वरिष्ठांनी दखल घेऊन वीज पुरवठा सुरळीत करावा
--त्रिंबक (भाऊ) फंड जळकोटवाडी
"सध्या भाजीपाला पिके उभी आहेत व द्राक्ष हंगाम काढणी सुरु झाली आहे. अशा परिस्थितीत पिकांना वेळेवर सिंचन करण्यासाठी वीजपुरवठा होत नाही. विद्युत पुरवठा करण्यासाठी तीन महिन्यापुर्वी नवीन पोल उभा केले. परंतु ते काम पोल उभा करुनच थांबले. त्यामुळे जुन्या लाईन वरुन वारंवार वीज पुरवठा खंडित होतो."
"नवीन ट्रान्सफॉर्मर जुलैमध्येच आला होता परंतु ट्रान्सफॉर्मर बसवण्यास विलंब झाला. बदलत्या भारनियमन वेळा, त्यात मधूनच खंडित होणारा वीजपुरवठा यामुळे पिकांना जगवायचे, अशी शेतकऱ्यांची ओरड आहेत."
"आठवड्यात 3 दिवस 8 तास दिवसा आणि उरलेले 4 दिवस 8 तास रात्रीची असते. त्यातच वारंवार वीजपुरवठा खंडित होतो. त्यामुळे शेतकऱ्यांना सिंचनाचा फार मोठा प्रश्न उभा राहिला आहे."
0 Comments