तुळजापूर:- शहरात आरोग्य सुविधांसाठी नामांकित असणारे तुळजापूर मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलतर्फे जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने 8 मार्च रोजी मोफत सर्वरोग निदान महाआरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.
कै. डॉ. सुजित अरूणराव मगर यांच्या स्मरणार्थ व जागतिक महिला दिनानिमीत्त ८ मार्च रोजी सकाळी १० ते सायं. ६ पर्यंत शिबिर आयोजित केले आहे.
या शिबिरात अस्थिरोग तज्ञ डॉ. कृष्णा स्वामी,डॉ. आकाश भाकरे,मधुमेह तज्ञ व कन्सलटंट फिजीशियन डॉ. प्रविण कुदळे,त्वचारोग तज्ञ डॉ. मोनल सुजित मगर,दंतरोग तज्ञ डॉ. प्रिया राजेश पाटील,रेडिओलॉजीस्ट सीमांश डायग्नोस्टीक सेंटर
डॉ. नेहा कदम-पाटील,जनरल सर्जन व कॅन्सर तज्ञ
डॉ. बालाजी समुद्रे,दंतरोग तज्ञ डॉ. राजेश पाटील,
कान, नाक, घसा तज्ञ डॉ.व्यंकटेश पोलावार,
बालरोग तज्ञ व जनरल डॉ. प्रशांत मोटे आदी डॉक्टर उपलब्ध राहून आरोग्य सेवा देणार आहेत.
तुळजापुर शहरातील नळदुर्ग रोडवरील गणेश नगर एस.टी. कॉलनीतील तुळजापूर मल्टिस्पेशालिटी हॉस्पीटल येथे या शिबिराचे आयोजन असून जास्तीत जास्त रुग्णांनी या महाआरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन डॉ.मोनल सुजित मगर व
डॉ. राजेश पाटील यांनी केले आहे.
0 Comments