Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

जागतिक महिला दिनानिमित्त वडगाव (काटी)माता-पालक मेळावा उत्साहात संपन्न; पुरुषांच्या वाढत्या व्यसनाधीनतेच्या विरोधात महिलांनी संघटित लढा देण्याची गरज-शारदाताई चुंगे

काटी/उमाजी  गायकवाड 
तुळजापूर तालुक्यातील वडगाव (काटी) येथील महात्मा गांधी विद्यालयात शनिवार दि.8 मार्च रोजी  जागतिक महिला दिनानिमित्त व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी वर्षानिमित्त माता-पालक मेळावा व त्यांचा सन्मान सोहळा उत्साहात संपन्न झाला. 

प्रारंभी विद्यालयाच्या माजी विद्यार्थिनी तथा पालक प्रतिनिधी दिपाली सुरवसे व अनिताताई साखरे यांच्या हस्ते पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करुन अभिवादन करण्यात आले. त्यानंतर जागतिक महिला दिनानिमित्त प्रशालेच्या वतीने उपस्थित सर्व माता-पालक व महिला,माजी विद्यार्थींनींचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत व शुभेच्छा देण्यात आल्या.

यावेळी उपस्थित महिलांना संबोधित करताना यशस्वी शेतकरी महिला शारदाताई चुंगे यांनी स्वतः दररोज कुटुंबासह  शेतीमध्ये श्रमाने भरघोस उत्पन्न घेऊन आर्थिक प्रगती कशी साधली याविषयी  सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच शेतीबरोबर जोडधंदा पशुपालन दुग्ध व्यवसाय या कामामध्ये ग्रामीण भागातील महिला सुद्धा मागे नसल्याचे  सांगत असताना कुटुंबातील पुरुषांच्या व्यसनाधीनतेचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालल्याची खंत व्यक्त करीत पुरुषांच्या व्यसनाधीनतेच्या विरोधात महिलांनी एकत्रित येऊन संघटितपणे लढा  देण्याची गरज असल्याचे सांगितले. महिलांनी कुटुंबापुरतेच मर्यादित न राहता निर्भिडपणे मुलीं, महिलांनी अन्यायाविरुद्ध आवाज उठवावा असे आवाहनही त्यांनी याप्रसंगी केले. 

कार्यक्रमासाठी  उपस्थित मान्यवरांचे आभार व सूत्रसंचालन सहशिक्षक प्रविण गुरव यांनी केले.

यावेळी मुख्याध्यापक गेनसिद्ध बिराजदार, विद्यालयातील जेष्ठ शिक्षक रेवणसिद्ध आंधळकर,  शारदाताई चुंगे, धनश्रीताई सुतार,सीताताई कापसे, विद्यादेवी आगलावे, दिपाली सुरवसे यांच्यासह विद्यालयातील माता-पालक संघातील पदाधिकारी, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments