राज्याचे माजी सहकारी मंत्री सुभाष (बापू)देशमुख यांच्या हस्ते दिलीप गाजरे यांना उत्कृष्ट कर्मचारी पुरस्कार देताना...
काटी/उमाजी गायकवाड
लोकमंगल उद्योग समूहाच्या वर्धापन दिनानिमित्त लोकमंगल मल्टी स्टेट को ऑफ सोसायटी लिमिटेड सोलापूर तुळजापूर विभागात रिजनल मॅनेजर पदावर कार्यरत असलेल्या तुळजापूर तालुक्यातील काटी येथील रहिवासी असलेल्या दिलीप बाळासाहेब गाजरे यांना नुकताच उत्कृष्ट कर्मचारी पुरस्कार राज्याचे माजी सहकार मंत्री तथा भाजपचे दक्षिण सोलापूरचे आमदार सुभाष (बापू) देशमुख यांच्या हस्ते सन्मान पत्र व मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
मागील जवळपास 15 वर्षांपासून काटी येथील दिलीप गाजरे हे लोकमंगल मल्टी स्टेट को ऑफ सोसायटी मध्ये काम करीत असताना संस्थेचे व ग्राहकांचे हित लक्षात ठेवून अतिशय तळमळीने व उल्लेखनीय काम करीत आहेत. त्यांच्या काम करण्याच्या पध्दतीची दखल घेऊन लोकमंगल उद्योग समुहाने दखल घेऊन त्यांना विविध मान्यवरांच्या उपस्थितीत उत्कृष्ट कर्मचारी पुरस्कार प्रदान करण्यात आला.
यावेळी राज्याचे माजी सहकार मंत्री तथा भाजपचे दक्षिण सोलापूरचे आमदार सुभाष (बापू) देशमुख, सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मनीष (भैय्या)देशमुख, लोकमंगल समूहाचे कार्याध्यक्ष रोहन (दादा) देशमुख यांच्यासह लोकमंगल समूहातील सर्व कर्मचारी उपस्थित होते.
0 Comments