Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

तुळजापूर ड्रग्जप्रकरणी तपास योग्य दिशेने सुरु; कोणाचीही गय केली जाणार नाही; लवकरच फरार आरोपीच्या मुसक्या आवळणार

 
काटी/उमाजी गायकवाड 
तुळजापूर ड्रग्ज प्रकरण हे राज्यासह देशभरात गाजत असून या ड्रग्जतस्करीत एकुण 36 आरोपी आहेत. या ड्रग्जप्रकरणी पोलिसांनी सोलापूर,पुणे, मुंबई, धाराशिव अशा विविध ठिकाणावरून आरोपींना अटक केली आहे. ड्रग्ज प्रकरणातील 36 आरोपींपैकी 15 जणांना पोलिसांनी अटक केली असून 21 आरोपी फरार आहेत. या प्रकरणी पोलिसांनी 10 हजार 744 पानी दोषारोपपत्र दाखल केले असून आरोपीवर संगणमताने ड्रग्ज खरेदी,विक्री, ड्रग्ज साठवणुक, ड्रग्ज विक्रीतुन बेकायदेशीर आर्थिक फायदा घेऊन अवैध संपत्ती कमावणे, ड्रग्ज सेवन करणे असा ठपका ठेवून कार्यवाही करण्यात आली आहे. या गुन्ह्यातील फरार आरोपींचा शोध सुरू असुन फरार आरोपींच्या नातेवाईकांना तामलवाडी पोलिस ठाण्यात बोलावुन खोलवर तपास करण्यात येत आहे.फरार आरोपींचे नातेवाईक कुठल्या राज्यात,जिल्ह्यात आहेत त्यांची सखोल माहिती फरार आरोपींच्या नातेवाईकांकडून तसेच मित्रांकडून घेतली जात आहे. तसेच पुणे येथील फरार आरोपी अटक करण्याच्या अनुषंगाने आरोपींचे नातेवाईक, मित्र अशा सर्वांची चौकशी करण्यासाठी त्यांना तामलवाडी पोलिस ठाण्यात बोलावुन घेऊन सखोल चौकशी करण्यात येत असून कुणालाही व्ही.आय.पी. ट्रीटमेंट देण्याचा प्रश्नच येत नाही असे सपोनि गोकुळ ठाकुर यांनी बोलताना सांगितले. 

तसेच तुळजापूर ड्रग्जप्रकरणी पोलिसांचा तपास योग्य दिशेनेच चालु असुन लवकरच फरार आरोपींच्या मुसक्या आवळल्या जाणार आहेत तसेच या ड्रग्जप्रकरणी कुणालाही सोडले जाणार नाही असे तपास अधिकारी तथा तामलवाडी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गोकुळ ठाकुर यांनी खाजगीत बोलताना सांगितले. तसेच हा तपास पोलीस अधिक्षक संजय जाधव, अप्पर पोलीस अधीक्षक शफकत आमना मॅडम, तत्कालीन अपर पोलीस अधीक्षक गौहर हसन, उपविभागीय अधिकारी डॉ निलेश देशमुख, व जिल्हा सरकारी वकील महेंद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली चालु आहे व यांच्या मार्गदर्शनाखालीच दोषारोपपत्र दाखल करण्यात आले असल्याचेही गोकुळ ठाकुर यांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments