काटी/उमाजी गायकवाड
तुळजापूर तालुक्यातील सावरगाव येथील मुख्य बस स्थानक शेजारील छञपती शिवाजी चौकात नागपंचमीचे औचित्य साधून छत्रपती शिवाजी महाराज सार्वजनिक शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने 65 फुट उंचीच्या भगव्या ध्वजाचे विविध मान्यवरांच्या उपस्थितीत ध्वजारोहण करण्यात आले.
प्रारंभी भजन गायनाच्या गजरात गावातील सर्व जातीधर्मातील एका सदस्यांच्या उपस्थितीत विशेत: सांप्रदायिक कार्यक्रमात नेहमी अग्रेसर असणारे यामध्ये प्रामुख्याने हभप आबा महाराज लिंगफोडे, हभप एकनाथ महाराज हुरडे,हभप श सचिन महाराज जोशी,
लोकप्रतिनिधी उपसरपंच धर्मराज शिंदे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीची पूजा करून कार्यक्रमाची सुरुवात केली.
त्यानंतर प्रत्येक जातीचा एक सदस्य यामध्ये काशिनाथ राऊत,आस्तिक शिंपले,मुकुंद कुलकर्णी,गणेश कुंभार,बबन मेंगले,रणजीत भालेकर,शंकर कांबळे,हनुमंत महामुनी, प्रभाकर फडके,सतीश कळसे,हनुमंत देवकर,राहुल भंडारी,
लक्ष्मण धडके, बालाजी सुतार, दत्तात्रय गायकवाड, एकनाथ अक्कलकोटे,सुनील काळे,सुलतान सय्यद, अशा एकूण 18 मान्यवरांच्या हस्ते व धनगरी ढोल व हलग्यांच्या निनंदात छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची पूजा करून शिवकालीन राजमुद्रेचे अनावरण माजी सभापती संतोष (दादा) बोबडे यांच्या हस्ते करण्यात आले तर पूर्वीपासून असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज चौक नाम फलकाचे अनावरण माजी सरपंच रामेश्वर (आबा) तोडकरी यांच्या हस्ते करण्यात आले. त्याचबरोबर ध्वजारोहणाचा कार्यक्रम 65 फुट उंचीच्या भगव्या ध्वजाचे ध्वजारोहण माजी जिल्हा परिषद सदस्य राजकुमार (भाऊ )पाटील
यांच्या हस्ते करण्यात आले.
त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीची आरती योगेश काळदाते,हनुमंत ताटे,लालासाहेब धामणे,सचिन राऊत,सुनील शिंदे, दत्ता डोके,सौरभ फंड,बलभीम मुळे,
ओकार पाटील,गणेश फंड, आदेश मेंगले,ज्योतीराम ताटे,
या शिवभक्त व ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत करण्यात आली. या सोहळ्यासाठी तामलवाडी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरिक्षक गोकुळ ठाकूर व तामलवाडी पोलीस स्टेशन संपूर्ण स्टाफ यांनी उपस्थिती दर्शवली. या सोहळ्याचे सूत्रसंचालन श्यामसुंदर माने व तुकाराम गवळी यांनी करून शिवजन्मोत्सव समिती यांच्यावतीने आभार मानले.
ताज्या बातम्यांसाठी संपर्क करा
मुख्य संपादक
Only न्युज धाराशिव
9923005236
0 Comments