Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

काटी येथील संभाजी उर्फ आण्णा दीक्षित यांची एनसीसी विभागाच्या पीआरसीएन कोर्स साठी निवड

काटी/उमाजी गायकवाड 
तुळजापूर तालुक्यातील काटीचे सुपुत्र तथा सोलापूर येथील सम्राट चौकातील रयत शिक्षण संस्थेच्या रावजी सखाराम हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज मधील शिक्षक संभाजी उर्फ अण्णा बाबुराव दीक्षित यांची एनसीसी विभागातील विद्यार्थ्यांना देश सेवा तसेच शारीरिक शिक्षण देणाऱ्या पीआरसीएन कोर्ससाठी निवड झाली आहे. ते नुकतेच राष्ट्रीय कॅडेट कोअर (NCC) च्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये देशभक्ती,शिस्त,नेतृत्व व सामाजिक बांधिलकी जोपासण्यासाठी नागपूर येथे ट्रेनिंग घेण्यासाठी नागपूर  रवाना झाले आहेत.साठ दिवसांच्या नागपूर येथील ट्रेनिंग कोर्समध्ये दिक्षित यांना शारीरिक प्रशिक्षण,ड्रिल,रायफल वापर, युद्धकला,नेतृत्व विकास,नकाशा वाचन, तंबू व्यवस्थापन,शिस्तीचे धडे आणि एनसीसीच्या कार्यपद्धतीचा सखोल अभ्यास दिला जाणार कोर्स नंतर त्यांना लेफ्टनंट पदवी प्राप्त होणार आहे. त्यामुळे भविष्यात एनसीसीमध्ये अधिकारी म्हणून स्थान मिळणार आहे.

काटी येथील सर्वसामान्य कुटुंबातील संभाजी उर्फ आण्णा दिक्षित शिक्षणाविषयी आवड असल्याने त्यांनी आजपर्यंत
 एम.एस्सी. गणित, बी. एड.,एम.एड.,एम.ए. इंग्रजी, डी.एस.एम., एम.सी.जे. अशा एकूण सहा पदव्या प्राप्त केल्या असून शिक्षण शास्त्र विषयातून पीएचडी करत आहेत. पीएचडी नंतर लेफ्टनंट ही आठवी पदवी असणार आहे.

दिक्षित यांची नागपूर येथे एनसीसी विभागाच्या पीआरसीएन कोर्स साठी निवड झालेबद्दल काटीसह परिसरातील शिक्षणप्रेमीकडून तसेच संस्थेचे मध्य विभागाचे कार्याध्यक्ष संजीव पाटील, संस्था सदस्य प्राचार्य डॉ सुरेश ढेरे, प्राचार्य डॉ राजेंद्रसिंह लोखंडे,ज्येष्ठ शिक्षक वसंत नागणे, मुख्याध्यापक भारत केत महावीर आळंदकर तसेच पालकवर्ग, विद्यार्थी व सामाजिक संस्थांकडून त्यांच्यावर अभिदनंदनाचा वर्षाव होत आहे.

ताज्या बातम्यांसाठी संपर्क करा....
मुख्य संपादक 
Only न्युज धाराशिव 
9923005236

Post a Comment

0 Comments