Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

सावरगाव नागनाथ महाराज यात्रा श्रावणी सोमवार व आमदार अभिजित(आबा)पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त भाविकांना केळीचे वाटप

काटी/उमाजी गायकवाड 
तुळजापूर तालुक्यातील सावरगाव येथे सोमवार दि. 28 रोजी श्रावणी सोमवारचे औचित्य साधून येथील प्रसिद्ध जाग्रत देवस्थान नागनाथ महाराज याञा व पंढरपूर तालुक्यातील विठ्ठल परिवाराचे नेते आणि श्री.विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन तथा माढा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट ) आमदार अभिजित (आबा) पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त विविध मान्यवरांच्या उपस्थितीत दि. पिपल मल्टीस्टेट बँकेच्या वतीने याञेनिमित्त येणाऱ्या भाविकांना केळीचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमास भाविकांचा उदंड प्रतिसाद मिळाला.

जनसेवेला हातभार लावण्यासाठी उपक्रम
"तुळजापूर तालुक्यातील सावरगाव येथील श्रावण अमावस्या ते नागपंचमी या कालावधीत प्रसिध्द जाग्रत देवस्थान नागनाथ महाराज याञेनिमित्त येणाऱ्या भाविकांना केळी वाटप करून जनसेवेला हातभार लावण्यासाठी आज पंढरपूर विठ्ठल परिवार व दि पिपल मल्टीस्टेट को.आँप बँकेच्या वतीने केळीचे वाटप केले. यानिमित्ताने सर्वांशी संवाद साधून लोकांची सेवा करण्यासाठी सर्वांनी संकल्प सुद्धा केला. यापुढेही दरवर्षी याञेनिमित्त सावरगावात फराळ, केळी वाटप करण्यासाठी आम्ही  कटीबद्ध आहोत."
           अर्जुन सुरेश पाटील, दहिवडीकर,ता.तुळजापूर

यावेळी अर्जुन सुरेश पाटील (दहिवडीकर),शिवकुमार पाटील (दहिवडीकर), राजकुमार माने, माजी जिल्हा परिषद सदस्य राजकुमार पाटील,माजी सरपंच रामेश्वर तोडकरी,धर्मराज शिंदे,रंगनाथ डोलारे,सयाजीराव देशमुख,अशोक जाधव,प्रकाश गाटे,भैरी काळे,राजकुमार माने,आकाश गाटे,संदीप भोसले,शुभम बोबडे,जीवन गाटे,बँक कर्मचारी आनंद रोहिदास, सूरज गरड,सुनील जाधव,गणेश गाटे,कृष्णा माने आदी मान्यवर उपस्थित होते.

पोलीस दलात निवड झालेबद्दल तानवडे यांचा सत्कार
सावरगाव येथील युवक विशाल बापूस तानवडे यांची नुकतीच महाराष्ट्र पोलीस दलात निवड होऊन धाराशिव ग्रामीण पोलीसमध्ये नियुक्ती मिळाल्यामुळे विविध मान्यवरांच्या उपस्थितीत दि. पिपल मल्टीस्टेट बँकेच्या वतीने अर्जुन (भैय्या) सुरेश पाटील,दहिवडी हस्ते विशाल तानवडे यांचा सत्कार करण्यात आला.

ताज्या बातम्यांसाठी संपर्क करा 
 मुख्य संपादक 
Only न्युज धाराशिव 
उमाजी गायकवाड 
9923005236

Post a Comment

0 Comments