Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

तुळजापूर येथे प्रभाग चारमध्ये जनसेवक वाघमारे यांच्या पुढाकारातून जंतूनाशक फवारणी

तुळजापूर:- पावसाळ्यात डेंग्यु, मलेरिया असे विविध प्रकारचे साथ आजार डोके वर काढतात. पावसाळ्यात डासांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढतो.त्यामुळे मलेरिया,डेंग्यू सारखे आजार होतात. सामाजिक बांधिलकीच्या जाणिवेतून व डेंग्यूसदृस्य आजारापासून नागरिकांचे आरोग्य सुरक्षित राहावे या उदात्त हेतूने तुळजापूरातील जनसेवक सुदर्शन (भैय्या) वाघमारे यांच्या पुढाकाराने व काँग्रेसचे उप-शहराध्यक्ष किरण यादव यांच्या प्रमुख उपस्थितीत तुळजापूर शहरातील प्रभाग 4 मध्ये पावसाळ्यात अनेक वेळा झाडे, झुडपे,घर परिसरातील उघड्या गटारांमुळे, सुरू असलेल्या बांधकामांच्या ठिकाणच्या खड्ड्यांमुळे डासांचे प्रमाण वाढत असून हे डास परिसरातील रहिवाशांना त्रासदायक ठरतात त्यासाठी ठिकठिकाणी जंतुनाशक फवारणी व तणनाशक फवारणी करण्यात येऊन परिसर व आरोग्यदायी ठेवण्यासाठी प्रयत्न केला आहे.

यावेळी काँग्रेसचे उप शहराध्यक्ष किरण यादव,राजाभाऊ चोपदार, अनमोल साळुंके,नागेश किवडे, अँड. शुभम खोले,सागर मस्के, दत्ता बेंद्रे,संकेत मस्के,आदित्य बुरांडे आदी मान्यवर उपस्थित होते.

आरोग्य, स्वच्छ परिसर व डेंग्यू मुक्त प्रभाग अभियान राबणार
   -जनसेवक सुदर्शन (भैय्या )वाघमारे
नागरिकांचे आरोग्य, स्वच्छ परिसर व डेंग्यू मुक्त प्रभाग अभियान सातत्याने राबविण्यात येणार असून यापुढेही प्रभागातील गल्ली-बोळात जंतुनाशक व तणनाशक फवारणी करुन नागरिकांचे आरोग्य व प्रभाग स्वच्छ ठेवण्यासाठी व नागरिकांच्या सेवेसाठी कटिबद्ध राहणार असल्याची ग्वाही प्रभाग चारमधील निवासी जनसेवक सुदर्शन (भैय्या) वाघमारे यांनी यावेळी दिली.

ताज्या बातम्यांसाठी संपर्क करा...
Only न्युज धाराशिव 
मुख्य संपादक 
उमाजी गायकवाड 
9923005236

Post a Comment

0 Comments