तुळजापूर:- असण्या इतकेच नसणे कधी सुंदर होते? जेव्हा आपल्या कर्तृत्वाने आपण, आपल्या असण्याला अर्थ प्राप्त करून देतो. आपल्या असण्याने दुसऱ्याच्या जीवनालाही अर्थ प्राप्त होतो, तेव्हाच असण्याइतके नसणेही सुंदर होते. अशावेळी शरीराने जरी आपण नसलो, तरी आठवणीने आणि चांगल्या कर्माने जनता जनार्दनाच्या मनात आपण असतोच. जसे ३५० वर्षानंतर आजही राजे मराठी माणसाच्या हृदयसिंहासनावर विराजमान आहेत.असा विचार यावेळी शिवव्याख्याते प्रशांत देशमुख यांनी दिला.
तुळजापूर तालुक्यातील आरळी बुद्रुक येथे कै. इंदुमती अशोकराव उकरंडे यांच्या द्वितीय स्मृतिदिनानिमित्त विविध क्षेत्रात यश संपादन केलेल्या ग्रामकन्यांचा रायगड येथील प्रसिद्ध शिवव्याख्याते आणि जय शिवराय पुस्तकाचे लेखक प्रशांत देशमुख यांच्याहस्ते कृतज्ञता पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
आरळीच्या माहेरवाशीन ग्रामकन्या सीमा अरुण जोत - गिरी, रिझवाना मिरासाहेब शेख - मुजावर, शुभांगी भीमराव सोनवणे - राऊत,सीमा मल्लिनाथ वैद्य, आदर्श माता पुरस्कार भिवराबाई वडवे यांना क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची प्रतिमांसह सन्मानपत्र, माहेरची साडी देऊन ग्रामकन्या कृतज्ञता पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. याप्रसंगी सरपंच किरण व्हरकट, मन्मथ उकरंडे,अब्दुल सय्यद,मधुमालती पारवे आदी उपस्थित होते.
बोलताना प्रशांत देशमुख म्हणाले की,राजामाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम महाराज यांनी केलेलं कार्य अलौकिक होते,अशा महान व्यक्तींचा जिवनप्रवास असण्याइतकाच नसल्यावर ही जगणं सुंदर असल्याची भावना शिवव्याख्याते प्रशांत देशमुख यांनी व्यक्त केली.
राजमाता जिजाऊ आणि शहाजीराजे यांनी एकत्रित जे स्वप्न पाहिलं ते सत्यात उरवण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज यांनी आपले जीवन खर्ची घातले, शिवचरित्राचा विचार अंगीकारण्यासाठी रायगडावर जायचं आणि जगण्याची ऊर्जा घेऊन यायचं तिथे जी अनुभूती मिळते यातून नक्कीच तुमचं जगणं सुंदर करावे.
स्मृतिदिनानिमित्त रायगड येथील प्रसिद्ध शिवव्याख्याते आणि जय शिवराय पुस्तकाचे लेखक प्रशांत देशमुख यांचे जगणं सुंदर आहे याविषयावर व्याख्यान सादर केले.प्रशांत देशमुख लिखित जय शिवराय या पुस्तकाचे प्राथमिक, माध्यमिक शाळा आणि विठोबा पारवे वाचनालय यांना वितरण करण्यात आले.
पुरस्कार सोहळ्याचे सूत्रसंचालन डॉ. भैरवनाथ कानडे यांनी केले, प्रस्तावना डॉ. शिवाजी उकरंडे यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी विकास जोत, धैर्यशील नारायणकर, शिवानंद गवळी, चंद्रकांत उळेकर,ज्ञानेश्वर उकरंडे,विलास उकरंडे,शेखर उकरंडे, प्रशांत उकरंडे आदींनी परिश्रम घेतले, याप्रसंगी उकरंडे परिवारातील सदस्यांसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ताज्या बातम्यांसाठी संपर्क करा....
Only न्युज धाराशिव
मुख्य संपादक
उमाजी गायकवाड
9923005236
0 Comments