काटी/उमाजी गायकवाड
रामायणाशी संदर्भ सांगणारे श्रीक्षेत्र तुळजापूर येथील घाटशीळ पावसाळ्यात अधिकच विलोभनीय दिसत आहे. माता मंदिरातील गाभाऱ्याचे काम सुरू असल्यामुळे मंदिर बंद असून देवी दर्शन बंद असल्याने येथे येणाऱ्या भाविकांची संख्या सोडवल्याने हिरवाईने नटलेला हा परिसर भाविक आणि पर्यटकांच्या प्रतिक्षेत आहे.
हिरवाईने नटलेला घाटशिळ रोडवरील निसर्ग सौदर्याचा आनंद घेताना तुळजापूर येथील पुजारी नगर फाऊंडेशनचे अध्यक्ष गणेश पुजारी, बापू जगदे, सिध्देश्वर इंगोले,राहुल जाधव.....
भारतातील शक्ती देवतांच्या 108 शक्तीपीठांपैकी महाराष्ट्रात साडेतीन शक्तिपीठे आहेत. आदिशक्तीच्या साडेतीन शक्तिपीठांपैकी पुर्ण पीठ असलेले कुलस्वामिनी तुळजाभवानी मातेचे तीर्थक्षेत्र अनेक पौराणिक,ऐतिहासिक घटनांशी जोडले गेलेले आहे. बालाघाट पर्वत रांगेत वसलेले आई तुळजाभवानी हे साडेतीन शक्तिपीठांपैकी एक पुर्णपीठ असून अवघ्या महाराष्ट्राचे दैवत आहे.महाराष्ट्रातील देवीच्या साडेतीन शक्तीपीठांपैकी एक समजल्या जाणाऱ्या तुळजापूरातील प्रसिद्ध आई तुळजाभवानीच्या पायथ्याशी व बालाघाट डोंगररांगात असलेला घाटशिळ मार्गावरील डोंगर रांगाने पावसाळ्यात हिरवा शालू पांगरल्याने निसर्गसुंदर सौंदर्यांने बालाघाट डोंगर रांगेतील घाटशिळ रोड दुरवरुन सर्वांचे आकर्षण ठरत आहे. नयनरम्य बालाघाट डोंगररांगातील श्री तुळजाभवानी मंदिरासह येथील उपदेवतांची मंदीरे,मठ,तीर्थकुंड पुरातन स्थापत्य शैलीची साक्ष देतात. तुळजापुरात आलेला भाविक असो वा पर्यटक त्यांची पावले बालाघाट डोंगररांगेतील घाटशीळकडे न वळली तरच नवल! सीतेच्या शोधात निघालेल्या प्रभू श्रीरामचंद्रांना श्री तुळजाभवानी देवीने येथूनच लंकेचा मार्ग दाखविल्याची आख्यायिका आहे. तसेच रजाकारांवर याच डोंगरावरुन टेहळणी केली जात असल्याचे सांगण्यात येते. धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गालगत तुळजापूरकडे येणाऱ्या प्रत्येकाला सर्वप्रथम घाटशीळचे दर्शन घडते. शहरालगत नागमोडी वळणाच्या रस्त्याने जाताना घाटशीळ सर्वांचे लक्ष वेधून घेते.पावसाळ्यात हिरव्यागार वृक्षांनी वेढलेला हा डोंगर अधिकच विलोभनीय दिसत आहे. डोंगरकड्यावरुन सर्वदुर हिरवीगार शेती,मध्येच असणारे शेततळे आणि माथ्यावर काळेकुट्ट ढग असे विलोभनीय दृश्य मोबाईल फोनच्या कॅमेरात कैद करण्याचा मोह या मार्गावरून जाणाऱ्यांना आवरत नाही.यावर्षी मात्र निसर्गाचे हे खुललेले सौंदर्य डोळ्यात साठवण्यासाठी मंदीर बंद असल्यामुळे सध्या भाविक व पर्यटकांची संख्या रोडावल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.
श्री मुदगुलेश्वर मंदीरातील सुंदर महादेवाची मुर्ती
ताज्या बातम्यांसाठी संपर्क करा...
Only न्युज धाराशिव
मुख्य संपादक
उमाजी गायकवाड
9923005236
0 Comments