काटी:- तुळजापूर तालुक्यातील केमवाडी परिसरात गुरुवार दि. 7 रोजी दुपारी 12:30 वाजनेच्या सुमारास पावसाचे वातावरण भरुन सर्वत्र काळवंडून आले. विजांचा कडकडाट व पावसाच्या जोरदार सरी पडत असताना तुळजापूर तालुक्यातील केमवाडीतील शेतकरी बाबासाहेब भिमराव फंड यांच्या दोन शेळ्या व दोन बकऱ्यांवर वीज पडल्यामुळे त्या जागीच ठार झाल्या.
या घटनेनंतर शेतकरी बाबासाहेब फंड यांनी तामलवाडी पोलीस ठाण्यात भ्रमणध्वनीवरून माहिती दिल्याने पोलीस हवालदार जुबेर काझी,वैद्यकीय अधिकारी चंद्रकांत सडके, तलाठी श्रीमती मयुरी आमदानी यांनी प्रत्येक्ष घटनास्थळी भेट देऊन घटनेचा पंचनामा केला असून तलाठ्यांनी वीज पडून चार शेळ्या ठार झाल्याबाबतचा अहवाल तहसिलदार पाठवला आहे. शेतकऱ्यांचे शेळ्या ठार झाल्यामुळे त्यांचे आर्थिक नुकसान झाल्याने सर्वञ हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
ताज्या बातम्यांसाठी संपर्क करा...
Only न्युज धाराशिव
मुख्य संपादक
उमाजी गायकवाड
9923005236
0 Comments