तुळजापूर:- संपूर्ण देशभरात आर्ट ऑफ लिव्हिंगचा आनंद उत्सव 12 ते 17 ऑगस्ट 2025 या कालावधीत एकाच वेळी राबविण्यात येत आहे.
विशेष वैशिष्ट्य म्हणजे या शिबिराला पूज्य गुरुदेव श्री श्री रविशंकर गुरुजी यांचे ऑनलाइन मार्गदर्शन लाभणार आहे. या शिबिरामध्ये जगातील 180 देशात कोट्यावधी लोकांनी अनुभवलेली श्वासावर आधारित असणारी "सुदर्शन क्रिया",प्राणायाम,ध्यान शिकायला मिळणार आहे.
सध्याच्या धावपळीच्या जीवनामध्ये सर्व मानव जातीला तणावमुक्त जीवनाचे महत्त्व कळू लागले आहे. सुदर्शन क्रिया तणावमुक्त, आनंदी जीवनासाठी अतिशय उपयुक्त ठरते.
या शिबिरामध्ये सुदर्शन क्रिया शिकल्यानंतर आपण रोज त्याचा अभ्यास केला तर आपल्या जीवनामध्ये सकारात्मकता, उत्साह, प्रेम, सृजनात्मकता असे अनेक गुण निर्माण होण्यास व वाढण्यास मदत होते. पर्यायने आपले जीवन आनंदी होते.
आर्ट ऑफ लिव्हिंगचा हा आनंद उत्सव उपक्रम तुळजापूर शहरात 12 ऑगस्ट ते 17 ऑगस्ट या दरम्यान दोन बॅचमध्ये राबविण्यात येणार आहे. यामध्ये पहिली बॅच सकाळी 6 ते 8.30 या दरम्यान तुळजापूर खुर्द येथील शिवपार्वती मंगल कार्यालयात सुरु होणार आहे.तर दुसरी बॅच शहरातील आठवडा बाजार जवळील सुमेरु हॉलमध्ये सायंकाळी 6 ते 8.30 कालावधीत होणार आहे.
तरी जास्तीत जास्त लोकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा.असे आवाहन आर्ट ऑफ लिव्हिंग तुळजापूरच्या वतीने करण्यात आले आहे.
ताज्या बातम्यांसाठी संपर्क करा...
Only न्यूज धाराशिव
मुख्य संपादक
उमाजी गायकवाड
9923005236
0 Comments