Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

झरेगाव येथील भक्तांचे श्रद्धास्थान श्री दत्त मंदिरात भाविकांनी गर्दी

तुळजापूर/उमाजी गायकवाड
 बार्शी तालुक्यातील झरेगाव येथील दत्त मंदीर देवस्थान हे तुळजापूर तालुक्या  पासून अवघ्या 20 कि. मी. अंतरावरील एक  प. पु.सद्गुरु काका महाराज पोटभरेचे झरेगाव हे छोटेसे गाव आज संपूर्ण दत्त उपसकांचे आशेचे, श्रद्धेचे केंद्रबिंदू बनलेले आहे. गुरुवार  दि. 7 रोजी दत्त भक्तांनी या ठिकाणी गर्दी केली होती.

श्रीक्षेत्र झरेगाव येथे दत्तमंदिर देवस्थान मागील 15 वर्षा पासून आहे.या ठिकाणातून समाजातील अठरापगड जाती व सर्वधर्मातील लोकांना तरुण पिढीला धर्मकार्याची,राष्ट्रकार्याची व समाजसेवेची शिकवण हभप काका महाराज देत आहेत.

दर गुरुवारी समाज प्रबोधनाच्या कार्यात पुज्यश्री काका महाराज पोटभरे झरेगाव येथील श्री दत्तमंदिर संस्थानात असतात. विविध ठिकाणाहून भाविक मोठ्या संख्येने झरेगाव येथील दत्त मंदिर व परमपूज्य काका महाराज पोटभरेंच्या दर्शनास येतात. दत्तमहाराजांना साकडे घालतात व महाराजांकडून आशीर्वाद घेऊन समाधानाने स्वगृही परततात. अनेकांना लाभ झाल्याचे भक्तगण एकमेकास श्रद्धेने सांगतात. श्री दत्त महाराजांचे कृपेने व परंमपूज्य काका महाराजांचे प्रेरणेने श्रीक्षेत्र झरेगाव येथे दत्तमहाराजांचे एक भव्य मंदिर व मंदीरापुढे भव्य सभामंडप साकारत आहे. मंदीराचे अत्यंत सुबक व उठावदार करण्यात येत आहे.

मंदीरावरील शिखराचे उंची काम  एक देखण्या मंदिराकडे नेण्याचा प्रयत्न आहे. सदर सर्व बांधकाम व विकास कामे भक्तगणाकडून स्वेच्छेने आलेल्या देणग्यातून होत आहे. तसेच भाविकाडून दर गुरुवारी अन्नदान केले जाते.

या मंदिर परिसरात भाविकांना जप, तप, साधना पारायण, ध्यानधारणा करण्यासाठी मोठे ध्यानमंदिर आहे. 

श्री सद्गुरू काका महाराजांचे वास्तव्य दत्तमंदिरात असते. दत्त उपासक काका महाराजांचे  व्यक्तीमत्व म्हणजे त्यांची राहणी अतिशय साधी असून समाजातील सर्वसामान्य माणसाची काळजी वाहण्याचे व त्यांचे जीवन सुखी,सुसह्य व सार्थकी करण्यासाठी त्यांनी आपले स्वतःचे जीवन समर्पित केले आहे.अहोरात्र जनसामान्याच्या सुखासाठी, त्यांच्या समस्या सोडविण्यसाठी ते सतत प्रयत्नशील आहेत.अंधश्रद्धेवर त्यांचा विश्वास नाही. समाजात रूढ असलेल्या रूढी, परंपरा,मान्यता प्रथम विज्ञाना नंतर धर्माच्या आणि सर्वात महत्त्वाच्या म्हणजे समाजाच्या कसोटीवर सत्य उत्तरल्याशिवाय विश्वास ठेऊ नये अशी त्यांची भक्तांना शिकवण आहे.

आध्यात्मिक,आर्थिक, सामाजिक प्रगतीसाठी कोणतीही उपासना, करण्यापेक्षा आपण करीत असलेले काम शंभर टक्के  प्रामाणिकपणे करणे हीच खरी देवपूजा व आराधना असल्याचे सांगून देव हा प्रत्येक भक्तावर  प्रेम करतो व तो भक्तीचा भुकेला असतो. त्यासाठी मनुष्याचे मन, शरीर व धन शुद्ध,पवित्र असणे आवश्यक असून आपल्यातील दोष, व्यसन, व आपले मन शुध्द करण्याचा सल्ला ते भाविकांना देतात. काका महाराजांनी दिलेल्या सल्ल्यानूसार जे भाविक चालतात त्या सर्वांचे जीवन सुखी झाल्याची प्रचीती आल्याने झरेगाव येथील दत्त मंदीरात येणाऱ्या सोलापूर,धाराशिव जिल्ह्यातील भक्तगणांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबराच्या जयघोषाने मंदिर परिसर भक्तीमय होत आहे.सद्गुरु काका महाराजांच्या कृपाप्रसादाने व कृपाशीर्वादाने सर्व भक्त आपल्या जीवनात सुखी व समाधानी होत असून दर गुरुवारी दत्त मंदीरात सद्गुरूच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या वाढत आहे.सर्व भक्तगण दर गुरुवारी नित्यनियमाने एकत्र येऊन भजन,कीर्तन, आरती सोहळ्यासारख्या कार्यक्रमात मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत.
ताज्या बातम्यांसाठी संपर्क करा...
मुख्य संपादक 
Only न्युज धाराशिव 
9923005236

Post a Comment

0 Comments