Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

काटी येथील येडेश्वरी कन्या प्रशालेतून सीमेवरील सैनिकांना 299 राख्या रवाना

काटी/उमाजी गायकवाड 
मराठा समाज सेवा मंडळ सोलापूर संचलित तुळजापूर तालुक्यातील काटी येथील येडेश्वरी कन्या प्रशालेतील विद्यार्थींनीकडून गुरुवार दि. 7 रोजी देशाच्या सिमेवर कार्यरत सैनिकांना 299 राख्या पाठवून रक्षाबंधन सण साजरा केला.

सामान्य माणूस प्रत्येक सण आपल्या कुटुंबीयांसोबत मोठ्या आनंदात आणि उत्साहात साजरा करतो परंतु आपल्या भारतीय सीमेवर असलेले जवान कोणताही सण आपल्या कुटुंबासोबत साजरा करू शकत नाहीत. त्याच पद्धतीने रक्षाबंधन हा सण देखील ते आपल्या कुटुंबाशिवाय साजरा करतात.त्यामुळे  तुळजापूर तालुक्यातील काटी येथील येडेश्वरी कन्या प्रशालेतील सर्व विद्यार्थिनींनी  राख्या जवानांना  पाठविण्याचा उपक्रम हाती घेऊन भारतीय सीमेवर तैनात असलेल्या जवानांना 299 राख्या  प्रशालेतून पाठविण्यात आल्या. या उपक्रमासाठी शाळेचे मुख्याध्यापक किशोर बनसोडे,शिक्षिकवृंद यांनी परिश्रम घेतले. या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

Post a Comment

0 Comments