तुळजापूर/अनिल आगलावे
शिक्षक म्हणजे केवळ ज्ञानाचा स्रोत नाही, तर तो विद्यार्थ्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवणारा मार्गदर्शक असतो. केवळ शैक्षणिक आव्हानांसाठीच नव्हे तर वर्गाबाहेरील जगाच्या गुंतागुंतीसाठी देखील तयार करतात. विद्यार्थ्यांच्या शिकण्याच्या प्रवासात मार्गदर्शक आणि सूत्रधार म्हणून काम करणारे असेच एक आदर्श शिक्षक म्हणजे कोहिनुर सय्यद सर होय.
12 ऑगस्ट आपका जन्मदिन, प्रकट दिनाच्या आपणास मनःपूर्वक शुभेच्छा सरजी
🎂💐🎂💐🎂💐🎂💐
शिक्षक म्हणून कार्य कर्तव्य बजावत असताना कौटुंबिक राजकीय आणि समाजसेवेचा वारसा असल्यामुळे सतत समोर येणारे प्रश्न किंवा समस्या सोडवण्यासाठी तत्परता विशेष गुण अंगी,हाडाचा शिक्षक असल्याने सहकारी शिक्षक बांधवांना न्याय मिळावा यासाठी शिक्षक संघटनेच्या माध्यमातून अविरत संघर्षमय कार्य करताना यश अपयशाची पर्वा न करता आपले सेवाकार्य सुरूच ठेवली, संघटक म्हणून स्वतः ची वेगळी ओळख निर्माण केली.
आपला गाव हा सर्वोच्च केंद्रबिंदू मानून नियमित गावविकास आणि मूलभूत सेवा सुविधाबाबत पाठपुरावा यातून कौटुंबिक समाजसेवा यातून राजकीय वारसा तयार झाला, या वारशाला प्रामाणिक राहत गावगाडा एक कुटुंब म्हणून सांभाळण्याच्या जबाबदारीचे शिवधनुष्य पेलण्याचे धाडस कोहिनुर सय्यद यांनी दाखवले. धाराशिव जिल्ह्यातील भूम तालुक्यातील बेळगाव पिपंळगाव हे ग्रुप ग्रामपंचायत असल्यामुळे विविध विचाराचे आणि सर्वच जाती धर्माचे गावकरी एकोप्याने एकसंघ कुटुंब म्हणून राहावे यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहेत.
अनेक दशक गावगाडा प्रमुख म्हणून काम करत असताना विविध शासकीय योजना असो वा सामाजिक उपक्रम, लहान थोरांपर्यत एक आपला हक्काचा माणूस वाटावा हे कोहिनुर सय्यद यांना काही सिद्ध करावं लागलं नाही, आपला स्थायी स्वभाव आणि प्रामाणिक सेवाभाव यातून ते सेवासमाजकार्य हातून अविरतपणे घडत आहे.
एक चांगला संघटक कसा असतो, एक चांगला संघटक आत्मविश्वासू, उत्साही आणि सकारात्मक दृष्टिकोन असलेला असतो. तो लोकांमध्ये सहज मिसळून जातो आणि त्यांच्या भावनांची कदर करतो. त्याचे बोलणे स्पष्ट आणि प्रभावी असते, ज्यामुळे लोकांना त्याच्यावर विश्वास बसतो. तो नेहमी कामात व्यस्त असतो, पण लोकांना सोबत घेऊन चालतो. तो एक चांगला श्रोता असतो आणि लोकांच्या अडचणी समजून घेतो.या सर्व गुणांनी एकत्रित मिलाप म्हणजे कोहिनुर सय्यद सर आहेत.
सरपंच परिषद पुणे महाराष्ट्र ही गावगाडयातील सरपंच असतात त्यांना मार्गदर्शक कसे मिळावे, आपला गाव कसा समृद्ध करावा, गावचे सेवाकार्य कशा पद्धतीने करावे, शासकीय योजना कशा राबवण्यात याव्यात, शासकीय योजनासह इतर माध्यमातून अर्थिक विकास कसा करायला हवा, सरपंच प्रतिनिधी म्हणून काम करत असताना निर्माण होणाऱ्या समस्या कशा साडवाव्यात यासाठी काम करणारी संघटना म्हणून सरपंच परिषदेची स्थापना झाली, संघटनेचे मार्गदर्शक बापु खोपे, प्रदेशाध्यक्ष जितेंद्रराजे भोसले, कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर वायाळ यांच्या हातात हात देत मराठवाड्यात सरपंच परिषदेचा विस्तार करण्यासाठी मिळालेली जबाबदारी राज्य संघटक म्हणून एक आदर्शवत कार्य कोहिनुर सय्यद सर करत आहेत.
सरपंच परिषदेचे राज्य संघटक म्हणून काम करत असताना आपला जिल्हा धाराशिव कुठे मागे नाही रहायला हवा यासाठी मजबूत आणि कार्यक्षम संघटन बांधणी करण्याचा निर्धार हा कोहिनुर सय्यद यांच्या संघटन कौशल्याची पावती देतो. धाराशिव जिल्ह्यात काहीतरी नवीन आणि एकसंघपणे काम करणे म्हणजे शिवधनुष्य पेलण्यासारखेच आहे. धाराशिव जिल्ह्यातील सरपंच परिषद संघटना ही महाराष्ट्र राज्यात एक अग्रेसर अशा कर्तव्यनिष्ठ सरपंच पदाधिकारी यांचे संघटन बांधणारे आदर्श संघटक म्हणून कोहिनुर सय्यद सर आहेत.
कोहिनुर सय्यद सरांच्या सर्वोच्च ऊर्जास्रोत असणाऱ्या सौभाग्यवती जिनत कोहिनुर सय्यद मॅडम यांनी ज्या पद्धतीने आपल्या जोडीदाराला साथ सोबत आणि पाठिंबा दिला आहे तो कौतुकास्पद असाच आहे, आपला लाईफ पाटनरची दैनंदिन दिनचर्या आणि सामाजिक, राजकीय, संघटनात्मक सर्व विचारांचा स्वीकार करून आपले कुटुंब सांभाळणे म्हणजे एक दिव्य कसोटीच असते.स्वतः ग्रामपंचायत सदस्य, स्वतः सरपंच, सरपंच परिषदेच्या राज्य महिला अध्यक्षा, एका राजकीय पक्षाच्या जिल्हा महिला अध्यक्षा, एक आदर्श माता यासह कोहिनुर सय्यद यांच्या पत्नी म्हूणन जी काही जबाबदारी पडेल ती सुख दुःखासह आनंदाने स्वीकार करून आयुष्याच्या सोबतीला आत्मविश्वासपूर्ण आधार देत साथ दिल्यामुळेच कोहिनुर सय्यद सर आपले सेवाकार्य पूर्ण करत आहेत.
कोहिनुर सय्यद सरांना आपल्याकडे असणाऱ्या सर्व कौटुंबिक,सामाजिक, राजकीय, आणि संघटनात्मक जबाबदारी पेलण्यासाठी कुलस्वामिनी आई श्री तुळजाभवानी माता निरोगी दीर्घायुष्य, ऊर्जादायी बळ देवो हिच प्रार्थना!! 🙏
आदरणीय श्री कोहिनुर सय्यद यांना जन्मदिनाच्या खूप खूप मनःपूर्वक शुभेच्छा...
शुभेच्छापत्र...
अनिल बी. आगलावे
संपादक - न्यूज हिरकणी
राज्य प्रसिद्धप्रमुख
-सरपंच परिषद पुणे महाराष्ट्र
0 Comments