Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांच्या वतीने बंजारा समाजासाठी दिला जाणार शिष्यवृत्तीचा लाभ; धाराशिव जिल्ह्यातील बंजारा समाजातील विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा- अँड. राज शशिकांत राठोड


धाराशिव:-ग्रामीण भागातील विद्यार्थी स्पर्धा परीक्षेद्वारे प्रशासकीय सेवेत यावे यासाठी राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांच्या संकल्पनेतून राज्यातील बंजारा समाजातील होतकरू विद्यार्थ्यांसाठी "मातोश्री प्रमिलादेवी दुलीचंद राठोड” शिष्यवृत्ती योजना" सुरु करण्यात आली असून यापुर्वी ही योजना नेर तालुका, यवतमाळ तालुक्यातील दिग्रस,दारव्हा येथे 100 गुणांची ही वस्तुनिष्ठ बहुपर्यायी परीक्षा सहा केंद्रावर घेण्यात आली होती. मातोश्री प्रमिलादेवी दुलीचंद राठोड शिष्यवृत्ती योजना ३.० आता राज्यभर राबवण्यात येणार आहे.

 ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आर्थिक परिस्थितीमुळे निवास भोजन व अन्य खर्च भागविण्यासाठी शहरात राहून स्पर्धा परीक्षेची तयारी करता येत नाही ही अडचण जाणून घेत राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांच्यातर्फे प्रतिमहा दहा हजार रुपयांची "मातोश्री प्रमिलादेवी दुलीचंद राठोड शिष्यवृत्ती" देण्यात येणार आहे. 
 दिग्रस विधानसभा मतदारसंघात यापूर्वी अभ्यासिका सुरू केले आहेत आता राज्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची उत्तम तयारी करता यावी यासाठी त्यांच्या वतीने अमरावती येथे दहा महिने प्रशिक्षण देण्यात येवून दरमहा दहा हजार रुपयांची शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. मंत्री संजय राठोड यांच्या पुढाकाराने ग्रामीण भागातील अभ्यासू व होतकरू विद्यार्थ्यांचे मनोधैर्य वाढले असून त्यांच्या मनात प्रशासकीय सेवेत जाण्याची जिद्द निर्माण झाली आहे. 

बंजारा समाजातील स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या हुशार आणि होतकरू विद्यार्थ्यांसाठी ही योजना एक सुवर्णसंधी ठरणार आहे. या योजनेंतर्गत निवड करण्यात येणाऱ्या 1000 विद्यार्थ्यांना आर्थिक मदत, दर्जेदार अभ्यास साहित्य आणि ऑनलाइन मार्गदर्शन मोफत दिले जाणार आहे.

या विद्यार्थ्यांनी केंद्र आणि राज्य प्रशासनातील विविध पदांवर प्रवेश मिळवून स्वतःचं आयुष्य घडवले असून, इतर विद्यार्थ्यांसाठी एक प्रेरणादायी वाट दाखवली आहे. त्यामुळे आता ही योजना राज्यव्यापी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

या योजनेअंतर्गत पात्र उमेदवारांची निवड स्पर्धा परीक्षेद्वारे केली जाणार असून परीक्षा केंद्र, दिनांक आणि वेळ याची माहिती लवकरच जाहीर केली जाईल. या परीक्षेसाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांनी किमान बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. नोंदणी प्रक्रिया 7 ऑगस्ट 2025 पासून सुरू होणार असून 20 ऑगस्ट 2025 पर्यंत विद्यार्थ्यांना अर्ज करण्याची संधी असेल.यासाठी एक ऑनलाइन फॉर्म उपलब्ध करून देण्यात आलेला आहे.

विद्यार्थ्यांनी ऑनलाइन फॉर्म  खालील लिंकवर भरावा.
https://forms.gle/StkFZrsVo1WHLPe79
विद्यार्थ्यांना काही अडचण आल्यास खालील मोबाईल नंबरवर संपर्क करावा...
8530370674, 9067580048

राज्याचे राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांच्या पुढाकाराने ग्रामीण भागातील अभ्यासू व होतकरु विद्यार्थ्यांचे मनोधैर्य वाढले बंजारा समाजातील तरुणांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत असून त्यांचा प्रशासकीय सेवेत जाण्याचा मार्ग सुकर झाला आहे़.

मंञी संजय (भाऊ) राठोड हे केवळ बंजारा समाजापुरते मर्यादित न राहता राज्यभरातील तरुणांच्या भविष्यासाठी काम करत असून, समाजाचं आपण देणं लागतं या भावनेतून 1000 (एक हजार) विद्यार्थ्यांची जबाबदारी उचलण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. समाजासाठी झटणारा, गरजूंना साथ देणारा आणि प्रत्येक कार्यात खंबीरपणे उभा राहणारा नेता म्हणून संजयभाऊ राठोड साहेब यांचं नाव राज्यभर गाजत आहे.

या शिष्यवृत्ती योजनेमुळे अनेक गरीब व होतकरू विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा मार्ग सुकर होणार असून, त्यांना स्पर्धा परीक्षांमधून यश मिळवण्याची मोठी संधी मिळणार आहे. त्यामुळे बंजारा समाजातील सर्व पात्र विद्यार्थ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा आणि आपल्या स्वप्नांना उंच भरारी घ्यावी असे आवाहन   सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्र धाराशिव जिल्हा समन्वयक अँड.राज शशिकांत राठोड यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments